मुंबई : भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असलेले काँग्रेसचे नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग याच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्याने ते भाजपच्या सहज गळाला लागल्याच्या चर्चा सुरु होत्या आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या देवदर्शनानंतर त्यांची कृपाशंकर सिंग यांच्याशी बराचवेळ चर्चा सुद्धा झाली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एक गोष्ट सिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे आणि जे गळाला लागतील त्यांची पार्श्वभूमी न पाहता केवळ पक्ष प्रवेश देऊन अर्थकारणाच्या जोरावर निवडणूका जिंकायच्या असच काहीस चित्र निर्माण होत आहे.

त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग जर सह-कुटुंब भाजपमध्ये गेले नाहीत तर नवल वाटायला नको, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. भ्रष्टाचाराच्या चक्रात अडकलेल्या कृपाशंकर सिंग यांच्यापुढे सुद्धा पर्याय नसल्याचेच राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

CM fadanvis visited at Congress leader Krupashankar singhs home