30 April 2025 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Parambir Singh Missing? | परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर पत्रकार परिषदा अन फरार होण्यावर फडणवीसांची धावती प्रतिक्रिया

Parambir Singh Missing

मुंबई, ०१ ऑक्टोबर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंह यांना देशाबाहेर (Parambir Singh Missing) जाण्यासाठी केंद्रानं मदत केल्याची भूमिका नाना पटोलेंनी मांडल्यानंतर त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “नाना पटोले काहीही बोलत राहतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठवाड्यातील अतीवृष्टीचं संकट आणि राज्य सरकारची मदत याविषयी देखील भूमिका मांडली आहे.

Opposition leader and former chief minister Devendra Fadnavis has slammed Nana Patole for helping the Center to help Parambir Singh go missing. Parambir Singh Missing :

नाना पटोलेंना खोचक टोला:
देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना खोचक टोला लगावला आहे. “नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. नाना पटोले असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीत देखील बोलू शकतात”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

राज्य सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या:
दरम्यान, मराठवाड्यात अतीवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर देखील फडणवीसांनी ताशेरे ओढले. “सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत हे वास्तव आहे”, असं फडणवीस म्हणाले.

मंत्री किंवा राज्यातील प्रमुख लोक तिथे गेले, तर प्रशासन देखील जागं होत असतं आणि लोकांना काहीतरी दिलासा मिळत असतो. अशा परिस्थितीत कुणीतरी आपलं ऐकतंय असं लोकांना वाटत असतं आणि ते महत्त्वाचं असतं. आम्ही देखील उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहोत. तिथली परिस्थिती सरकारपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू”, असं देखील फडणवीस म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh Missing Devendra Fadnavis avoid to give reply on Nana Patole’s allegations.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या