3 May 2024 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

राफेल डील: सोशल मीडियावर #MeraPMChorHai वरून काँग्रेस-भाजपमध्ये तुंबळ युद्ध, ट्विटर ट्रेंडमध्ये

नवी दिल्ली : फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींकडून राफेल डीलवरून आलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये समाज माध्यमांवर तुंबळ युद्ध सुरु झालं आहे. फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेवरून काँग्रेसमध्ये जोश निर्माण झाला असून, भाजप तोंडघशी पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांना थेट लक्ष करत, फ्रान्सचे राष्ट्रपती पंतप्रधानांना चोर बोलत आहेत, असा टोला लगावला होता.

राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांचं घराणंचं भ्रष्टाचाराची जननी असल्याची टीका भाजपाकडून रवी शंकर प्रसाद यांनी केली होती. मोदी सरकारकडून राफेल करारासाठी केवळ अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असा धक्कादायक खुलासा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केला होता.

यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर पत्रकार परिषदेत टीकेची झोड उठवली. ‘नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मागच्या दारानं करारात बदल केले. नरेंद्र मोदी आणि अंबानी यांच्यात काय डील झालं हे देशाला कळायला हवं. मोदी आणि अंबानी यांनी देशाच्या संरक्षण दलांवर १ लाख ३० हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे,’ असा घणाघात राहुल यांनी केला. फ्रान्सचे माजी अध्यक्षच नरेंद्र मोदींना चोर म्हणाले, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. यानंतर ट्विटरवर #MeraPMChorHai ट्रेंडमध्ये आल्याचे चित्र आहे.

काय आहे नेमकं हे ट्विटर वॉर?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x