30 April 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

रंगवलेल्या शौचालयातून पर्यटन? कोणता सुगंधी सोन्याचा आनंद मिळणार पर्यटकांना? वास्तव

नवी दिली : युरोपमध्ये विविध पर्यटक तिथल्या घराच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहण्यासाठी जातात. त्यामुळे एक दिवस भारतातील शौचालय इतकी सुंदर होतील की ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. वास्तविक काँग्रेसच्या काळातील ‘हागणदारी मुक्त गाव’ योजना वेगळ्या नावाने राबवून, त्यावर प्रचंड जाहिरातबाजी करत मोदी सरकारने ती योजनाच हायजॅक केली आहे.

वास्तविक पर्यटन हा विषय आधीच्या किंवा सध्याच्या सरकारने कधी गंभीरपणे घेतल्याचे ऐकवत नाही. तसे असते तर देशाची परकीय चलनाची गंगाजळी कितीतरी मोठी झाली असती. मुळात देशात इतकी ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळं लाभली असताना त्या ठिकाणी मूळ पायाभूत सुविधांचाच अभाव आजही जाणवतो. दुसरीकडे गोवा सारखं राज्य पर्यटनातून मोठा महसूल जमवत, परंतु त्याला मूळ कारण म्हणजे तिथला निसर्ग आणि पडद्याआड फोफावलेला सेक्स टुरिझम तर केरळ देखील तिथल्या सुंदर निसर्ग, हेल्थ टुरिझम आणि पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांमुळे वाढीस लागला आहे. कोणतेही पर्यटक तिथले शौचालय पाहण्यास येत नाहीत.

दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केल्यास कोकणात सुंदर निसर्ग आणि निळेक्षार समुद्र किनारे असून देखील आणि मागील १०-१५ वर्षापासून घराघरात यशस्वी ठरलेली ‘हगणदारी मुक्त गाव’ योजना, अशी परिस्थिती असताना देखील तिथलं पर्यटन वाढीस लागलं नाही. कारण तिथे पर्यटकांना हव्या असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव आजही आहे. घराघरात रंगवलेले संडास बांधल्याने पर्यटक आले असते तर कोकण आज जगात सर्वात उच्च स्थानी असला असता. त्यात मोदींनी कालच्या भाषणात युरोपमध्ये विविध पर्यटक तिथल्या घराच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहण्यासाठी जातात याचा उच्चार केला. परंतु, घर आणि घराबाजूची सुदर फुल बागांची सजावट अशी एक ना अनेक कारण त्यामागे आहेत हे मोदी विसरले असावेत. त्याघरातील शौचालय पाहण्यासाठी पर्यटक येत नसतात हे आधी मोदींनी समजून घ्यायला हवं.

मुळात देशात सरकारने बांधलेलं सार्वजनिक संडास कोणत्याही देखभालीशिवाय उपलब्ध असल्याने आतमध्ये केलेल्या विधी लिकेज मुळे बाहेरच गळताना दिसतात. परिणामी त्याचा वापर कमी होतो. त्यात गावातील अर्ध्याहून अधिक शौचालयही केवळ सरकारी अनुदान लाटण्यासाठी लाटण्यासाठीच बांधली जातात. आज सरकारने संडास बांधून दिली असताना देखील, मुंबईच्या रेल्वे पटऱ्यांवर पाण्याचे डबे भरून रोज रंगकाम करणारे परप्रांतीयांचे लोंढे पर्यटनासाठी राबताना प्रवाशांना रोज नजरेस पडतात. त्यामुळे शौचालय ही काही पर्यटनाची गोष्ट नाही हे आधी मोदींनी समजून घ्यावं. केवळ मी काहीतरी ऐतिहासिक बोलतो आहे यासाठी मोदींनी केलेला अजून एक अट्टहास असंच कालच भाष्य म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x