16 May 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Crompton Greaves Consumer Electricals Share Price | सध्या स्वस्त झालेला क्रॉम्प्टन ग्रीव्हज शेअर 45 टक्के परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस पाहा

Crompton Greaves Consumer Electricals Share Price

Crompton Greaves Consumer Electricals Share Price | मागील काही महिन्यांपासून ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची आदळआपट पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 254.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Crompton Greaves Consumer Electricals Limited)

गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.68 टक्के वाढीसह 256.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO मॅथ्यू जॉब यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण सुरू झाली. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स स्टॉक 12.30 टक्के घसरले आहेत.

ब्रोकरेज फर्मचा सल्ला :
फॉरेक्स ब्रोकरेज नोमुरा इंडियाने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात बदल झाला असूनही क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनी उत्पादनातील नाविन्य, त्याच्या ब्रँडमधील नाविन्य आणि वाढत्या देशांतर्गत उत्पादनामुळे व्यवसाय वाढीवर लक्ष केंद्रित करून व्यवसाय विस्तार करत आहे.

पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 45 टक्के वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. नोमुरा इंडियाने म्हंटले आहे की, क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या पाइपलाइनमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने आणि काही क्षेत्रातील उपक्रम प्रलंबित आहेत.

व्यवस्थापनात मोठे बदल :
क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठे बदल पाहायला मिळाले आहे. 1 मे ते 30 एप्रिल 2028 पर्यंत पाच वर्षांसाठी कंपनीने प्रमित घोष यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. मॅथ्यू यांनी 24 एप्रिल 2023 रोजी आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देऊन पद त्याग केल्यानंतर कंपनीने नवीन सीईओची नियुक्ती केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Crompton Greaves Consumer Electricals Share Price Today on 27 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x