16 May 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे
x

Netweb Technologies IPO | नेटवेब टेक्नोलॉजी IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला, शेअर एकदिवसात मालामाल करणार?

Netweb Technologies IPO

Netweb Technologies IPO | नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 90 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. (Netweb Share Price)

ग्रे मार्केटमध्ये नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 378 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीने आपल्या IPO मधे शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित केली होती. नेटवेब टेक्नोलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स 27 जुलै 2023 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणार आहेत.

नेटवेब टेक्नोलॉजीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 378 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. यावरून असे कळते की, हा स्टॉक शेअर बाजारात 75 टक्के अधिक किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. जर समजा नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 500 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले, आणि शेअरची ग्रे मार्केट किंमत 378 रुपये किमतीवर स्थिर राहिली तर हा स्टॉक 878 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगवर 75 टक्के परतावा मिळू शकतो. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे. तर शेअर्सचे वाटप सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी पूर्ण केले जातील.

नेटवेब टेक्नोलॉजीज कंपनीचा IPO एकूण 90.55 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 19.48 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 83.21 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

त्यावेळी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 220.69 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 55.92 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना नेटवेब टेक्नोलॉजीज कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 आणि कमाल 13 लॉटमध्ये पैसे गुंतवण्याची मुभा होती. आणि नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीने आपल्या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 30 शेअर्स ठेवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Netweb Technologies IPO today on 21 July 2023.

हॅशटॅग्स

Netweb Technologies IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x