16 May 2024 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

IRFC Share Price | अल्पावधीत कमाई करायची आहे? IRFC शेअरने 5 दिवसात 25 टक्के परतावा दिला, पुढे अजून तेजीत परतावा कमवा

IRFC Share Price

IRFC Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार जबरदस्त अस्थिर पाहायला मिळाला. मात्र भारतीय रेल्वेच्या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 50 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात आयआरएफसी कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के मजबूत झाली आहे. शुक्रवारी IRFC कंपनीचे शेअर्स 39.81 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 45.25 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के वाढीसह 44.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेवटच्या काही मिनिटात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींगला सुरुवात झाली होती. गुरुवारी हा स्टॉक 12.53 टक्क्यांच्या वाढीसह 44 72 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 25 टक्के मजबूत झाला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आयआरएफसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 48.30 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 20.80 रुपये होती.

2023 या वर्षात IRFC कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षभरापूर्वी आयआरएफसी स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता दुप्पट झाले आहे. या कालावधीत IRFC कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळाली आहे.

एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअरने लोकांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. फक्त आयआरएफसीच नाही तर, इतरही रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. कारण भारत सरकार विकास कामावर खर्च करत असलेला पैसा विविध रेल्वे कंपन्यांना वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे वर्क ऑर्डर देण्यासाठी वापरत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price today on 05 August 2023.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x