16 May 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार?
x

SBI Share Price | तुमच्या भरवशाच्या सरकारी SBI बँकेचा शेअर अल्पावधीत 28 टक्क्यांपर्यंत परतावा देईल, कमाई करणार?

SBI Share Price

SBI Share Price | सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स पुढील काळात 770 रुपयेपर्यंत वाढू शकतात. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 600 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरवर 770 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही शेअर टार्गेट प्राईस सध्याच्या किमतीच्या तुलनेत 28 टक्के जास्त आहे. म्हणजेच अप ट्रेण्ड मध्ये या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 28 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मनेही या बँकेच्या स्टॉकवर 700 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. या दोन्ही ब्रोकरेज कंपन्यांनी SBI खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉक 1.79 टक्के वाढीसह 598.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजार तज्ञ स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. एकूण 40 तज्ञापैकी 23 जणांनी SBI स्टॉकवर स्ट्रॉंग बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 14 तज्ञांनी या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 3 जणांनी हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील एका महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 629.55 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 499.35 रुपये होती.

सध्या भारतीय शेअर बाजारात खूप अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिर बाजारात शुक्रवारी निफ्टी बँक इंडेक्स 0.56 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये 3.22 टक्क्यांची मजबूत तेजी आली होती. आणि निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स देखील हिरव्या निशाणीवर वाढत होता.

निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समधील सर्व 12 बँकांचे शेअर्स 0.35 टक्के ते 5.03 टक्के दरम्यान ट्रेड करत होते. युनियन बँक ऑफ इंडिया स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. कॅनरा बँक स्टॉक 4.47 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा स्टॉकमध्ये 4 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price today on 23 September 2023.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x