17 May 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Blue Jet Healthcare IPO | ब्लू जेट हेल्थकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पहा, एकाच दिवसात मजबूत कमाई होईल

Blue Jet Healthcare IPO

Blue Jet Healthcare IPO | ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गुंतवणुकीसाठी मंदीच्या काळात देखील या IPO ला भरघोस प्रतिसाद दिला आहे. ओपनिंगच्या पहील्याच दिवशी ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO 70 टक्के सबस्क्राइब झाला होता.

ब्लू जेट हेल्थकेअर आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 80 टक्के आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 0.01 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये गैरसंस्थात्मक गुंतवणुकदारांचा राखीव कोटा 1.38 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 329 रुपये ते 346 रुपये दरम्यान निश्चित केली होती. या कंपनीने एका लॉटमध्ये 43 शेअर्स ठेवले आहेत. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,878 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO 25 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीचा IPO स्टॉक 6 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते ब्लू जेट हेल्थकेअर IPO स्टॉक 24 ऑक्टोबर 2023 रोजी 63 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 34 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसात या कंपनीच्या ग्रे मार्केट किमतीत घट झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Blue Jet Healthcare IPO today on 26 October 2023.

हॅशटॅग्स

#Blue Jet Healthcare IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x