17 May 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Vodafone Idea Share Price | फक्त 13 रुपयाचा पेनी शेअर! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पावधीत पैसे दुप्पट करतोय

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्ज बजारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. व्होडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी मानली जाते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत होती. मात्र शुक्रवारी व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.36 टक्के घसरणीसह 13.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एचडीएफसी बँकेने नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीला 2000 कोटी रुपये मूल्याचे कर्ज दिले आहे. हे पैसे व्होडाफोन आयडिया कंपनी 5G स्पेक्ट्रम आणि परवाना शुल्कसाठी खर्च करणार आहे. या कर्जाची मुदत दोन वर्ष निश्चित करण्यात आली आहे. परंतु पुन्हा एकदा व्होडाफोन आयडिया कंपनी इक्विटीद्वारे भांडवल उभारणीचा विचार करत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे सीईओ म्हणाले की, कंपनीचे प्रवर्तक कंपनीमध्ये 2000 कोटी रुपये गुंतवणूक करू शकतात.

सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीवर 2.11 लाख कोटी रुपये कर्ज आहे. प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत असल्यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनी अद्याप 5G स्पेक्ट्रम सेवा सुरू करू शकली नाहीये. प्रचंड कर्जामुळे आणि खराब कामगिरीमुळे कंपनीने मोठा ग्राहक वर्ग गमावला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या प्रतिस्पर्धी एअरटेल आणि रिलायन्स जिओ कंपनीने आधीच आपल्या ग्राहकांना 5G सेवा प्रदान करायला सुरुवात केली आहे.

मागील पाच दिवसांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.92 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 105.07 टक्के वाढला आहे. सहा महिन्यांपूर्वी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 6.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 13.70 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE 04 November 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x