16 May 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Olectra Share Price | हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा! 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, आता कंपनीला मोठं कंत्राट मिळालं

Olectra Share Price

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मात्र आज या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सातत्याने वाढ झाल्यानंतर शेअरमध्ये किंचित नफा वसुली होणे, क्रमप्राप्त असते. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 1.86 टक्के घसरणीसह 2,062.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने 4000 कोटी रुपये मूल्याचे 2400 इलेक्ट्रिक बस पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सध्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीकडे 9000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स आठ टक्क्यांच्या वाढीसह 2222 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 374.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 445 टक्के नफा कमावून दिला आहे. या वर्षी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक तब्बल 60 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.02 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 49.98 टक्के भाग भांडवल धारण केले होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी Megha Engineering and Infrastructure Limited ची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक बसेस बनवण्याचा व्यवसाय करते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी भारतातील पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्कसाठी सिलिकॉन रबर/संमिश्र इन्सुलेटर बनवणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Share Price NSE Live 23 February 2024.

हॅशटॅग्स

Olectra Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x