17 May 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

GTL Share Price | जीटीएल कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट, स्वस्त शेअर तुफान तेजीत येणार

GTL Share Price

GTL Share Price | जीटीएल अर्थात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 55.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एक ऑर्डर दिली आहे. आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 58.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार आरआयएल कंपनीने त्यांना 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. तेव्हापासून या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला पुढील आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून आणखी काही ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांमधील भागीदारी आणखी मजबूत होईल.

मागील एका वर्षात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या स्मॉलकॅप स्टॉकची किंमत 11.20 रुपयेवरून वाढून 55.95 रुपये किमतीवर पोहोचली आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 400 टक्के परतावा कमावला आहे. 6 मार्च 2023 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात स्प्लिट करण्यात आले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45 रुपयेवरून वाढून 55.95 रुपये किमतीवर पोहचली आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड ही कंपनी मुख्यतः सिरिंज मोल्डिंग आणि मोल्ड्स तयार करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 06 March 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x