17 May 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

GMP IPO | सुवर्ण संधी! नवीन IPO लाँच, पहिल्याच दिवशी होईल मजबूत कमाई, GMP ने दिले संकेत

GMP IPO

GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. जेजी केमिकल्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या आयपीओला पहिल्याच दिवशी 100 टक्क्यांपेक्षा जास्त बोली प्राप्त झाली होती. या कंपनीचा IPO 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 251.19 कोटी आहे. ( जेजी केमिकल्स कंपनी अंश )

जेजी केमिकल्स कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 210 रुपये ते 221 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीने एका लॉटमध्ये 67 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदाराला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 14,807 रुपये जमा करावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात.

या कंपनीच्या IPO ला किरकोळ श्रेणीत सर्वाधिक म्हणजेच 3.40 पट बोली प्राप्त झाली आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना श्रेणीत 0.01 पट बोली प्राप्त झाली आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीमधील राखीव कोट्यासाठी 2.24 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, जेजी केमिकल्स कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 50 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक लिस्टिंग होईपर्यंत याच किमतीवर टिकला तर पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

जेजी केमिकल्स कंपनी आपल्या IPO द्वारे 75 लाख फ्रेश शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. त्याचबरोबर या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत 39 लाख शेअर विकले जाणार आहे. जेजी केमिकल्स ही कंपनी अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 75.36 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यात यशस्वी ठरली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMP IPO of JG Chemicals IPO 06 March 2024.

हॅशटॅग्स

#GMP IPO(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x