17 May 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Ashok Leyland Share Price | भरवशाचा शेअर! तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग जाहीर, पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतात. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 173.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 173.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्मच्या मते, अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर 221 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मधील शेवटच्या तिमाहीसाठी प्रति इक्विटी शेअर 4.95 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या अंतरिम लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 3 एप्रिल 2024 हा दिवस निश्चित केला होता.

अशोक लेलँड कंपनी 23 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात अंतरिम लाभांश जमा करेल. अशोक लेलँड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एकदा बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. ऑगस्ट 2011 मध्ये कंपनीने या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 बोनस या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. सोबतच कंपनीने 1:10 या प्रमाणात आपले शेअर्स स्प्लिट केले होते.

ब्रोकरेज फर्म केआर चोक्सीच्या तज्ञांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, सध्या अशोक लेलँड स्टॉक 21.1x मल्टीपल वर ट्रेड करत आहे. तज्ञांनी हा स्टॉक 221 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अशोक लेलँड कंपनीला पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, वाढती मागणी यांचा फायदा होणे अपेक्षित आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 205 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 04 April 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x