16 May 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

JP Power Share Price | 18 रुपयाच्या शेअरची जोरदार खरेदी सुरू, कंपनीबाबत नवीन अपडेटने तेजी, खरेदीचा सल्ला

JP Power Share Price

JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने GE पॉवर इंडिया कंपनीला 774.90 कोटी रुपये मूल्याच्या 2 ऑर्डर दिल्या आहेत. ही ऑर्डर D&E आणि निगरी येथील सुपर थर्मल पॉवर प्लांटचे काम करण्यासाठी तसेच बिना येथील थर्मल पॉवर प्लांटला ओल्या चुनखडीवर आधारित असलेले FGD पुरवण्यासाठी देण्यात आली आहे. ( जयप्रकाश पॉवर कंपनी अंश )

निग्री प्लांटसाठी जी ऑर्डर देण्यात आली आहे, त्याचे एकूण मूल्य 490.5 कोटी रुपये आहे. आणि बीना प्लांटसाठी जी ऑर्डर देण्यात आली आहे, त्याचे मूल्य 284.4 कोटी रुपये आहे. निग्री प्लांटच्या कामाची पूर्तता 33 महिन्यात करायची आहे. तर बिना प्लांटच्या कामाची पूर्तता 30 महिन्यात करायची आहे. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी जयप्रकाश पॉवर स्टॉक 2.17 टक्के वाढीसह 18.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 17.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 23.99 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स 15 मे 2023 रोजी 5.57 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

डिसेंबर 2023 तिमाहीत जयप्रकाश पॉवर कंपनीने 172.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीने 68.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत जयप्रकाश पॉवर कंपनीला 217.97 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत जयप्रकाश पॉवर कंपनीचा महसूल 82.36 टक्के वाढीसह 2,190 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जयप्रकाश पॉवर कंपनीचा डिसेंबर तिमाहीत पॉवर विभागातील महसूल 1,530.53 कोटी रुपये, आणि कोळसा विभागातील महसूल 235.37 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर वाळू खाण विभागात कंपनीने 659.87 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Power Share Price NSE Live 05 April 2024.

हॅशटॅग्स

JP Power Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x