17 May 2024 3:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

IDFC First Bank Share Price | FD नव्हे! या बँकेचा स्वस्त शेअर अल्पावधीत देईल 21% परतावा, टार्गेट प्राईस जाहीर

IDFC First Bank Share Price

IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेफरीज फर्मने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्सवर कव्हरेज सुरू केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या बँकेचे शेअर्स 100 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत आहेत. ( आयडीएफसी फर्स्ट बँक अंश )

मागील एका वर्षात या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 82.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जेफरीज फर्मने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या स्टॉकवर 100 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 82.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स पुढील काळात 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. जेफरीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, बँकेच्या मालमत्तेवरील परतावा आणि इक्विटी परतावा यामध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते. जेफरीज फर्मच्या मते, बँकेच्या ठेवीत झालेली मजबूत वाढ 2024 ते 2027 याकाळात कर्ज वितरणातील वाढीला सहाय्य करेल.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स 2.22 टक्क्यांच्या वाढीसह 82.46 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या बँकेच्या स्टॉकमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले होते. मागील एका आठवड्यात या बँकेचा शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने आयडीएफसी फर्स्ट बँकेला 1 कोटी रुपये दंड ठोठावला होता. मात्र याचा कंपनीच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDFC First Bank Share Price NSE Live 09 April 2024.

हॅशटॅग्स

#IDFC First Bank Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x