16 May 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने उत्तर प्रदेशमधील गोरखपूर प्लांटमध्ये कार्बोनेटेड शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्सचे व्यावसायिक उत्पादन सुरू केल्याची माहिती 13 एप्रिल 2024 रोजीच्या सेबी फाइलिंगमध्ये दिली होती. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीकडे 40 प्रगत उत्पादन सुविधा केंद्र होते. यापैकी 34 भारतात आणि 6 परदेशात कार्यरत आहे. ( वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी अंश )

याशिवाय वरुण बेव्हरेजेस कंपनी 2,500 पेक्षा जास्त वाहनांचा ताफा व्यवस्थापित करते. या कंपनीकडे 2,400 पेक्षा जास्त प्राथमिक वितरक आणि 120 हून अधिक डेपो आहेत. सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 1,371.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीत वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या नफ्यात वाढ झाली होती. वरुण बेव्हरेजेस कंपनीने डिसेंबर तिमाहीत 132 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा 75 कोटी रुपये होता. जो एका वर्षात 77 टक्क्यांनी वाढला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 2,731 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 2,257 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो वार्षिक आधारावर 21 टक्क्यांनी वाढला आहे.

12 एप्रिल 2024 रोजी वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स 2.38 टक्क्यांच्या घसरणीसह 1,390 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 94.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,561.95 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price NSE Live 15 April 2024.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x