29 April 2024 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

इस्त्रायल | ट्रम्प'नंतर मोदींचे परममित्र पंतप्रधान नेतन्याहू युगाचा अस्त | इस्त्रायलमध्ये महाविकास आघाडी फॉर्मुला

Benjamin Netanyahu

जेरुसलेम, ०३ जून | मोसादसोबतच्या संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अध्यक्ष बदलल्यानंतर आता इस्त्रायलमध्ये नरेंद्र मोदींचे मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युगाचा अस्त झाला आहे. विरोधी पक्षांनी एकजूट होत नवीन सरकार बनविण्याची घोषणा केली आहे. यामुळे नेतन्याहू यांना बऱ्याच वर्षांपासूनची सत्ता सोडावी लागणार आहे.

महत्वाचे म्हणजे सात खासदारांचा पाठिंबा असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदा मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीतही अशीच परिस्थिती होती. यामुळे नेतन्याहू हे काळजीवाहू पंतप्रधान होते. नेतन्याहू यांच्या पक्षाला दोन नंबरच्या जागा मिळाल्या होत्या. तरी देखील इस्त्रायलचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी नेतन्याहू यांना सरकार बनविण्यासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 जूनपर्यंतचा वेळ दिला होता.

निवडणूक निकालानंतर ‘राम’ (Raam) नावाचा कट्टर अरब इस्लामिक पक्ष तिथे किंगमेकर बनला होता. बहुमतासाठी नेतन्याहू यांना 61 जागांची गरज होती. युनायटेड अरब लिस्ट, ज्याला हिब्रू भाषेत राम म्हटले जाते, हा पक्ष सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या नेतन्याहूंचे भविष्य ठरविणार होता. विरोधी पक्षाचे नेते येर लेपिड यांनी संरक्षण मंत्री बेनी गांट्ज यांच्या सहयोगाने गेल्या वर्षी निवडणूक लढविली होती. मात्र, नेतन्याहू आणि गांट्ज यांच्यामध्ये सत्ता समीकरणे बनली आणि ते मागे हटले. आता पुन्हा येर लेपिड यांनी नेतन्याहूंना हरविण्य़ाचा दावा करत प्रचार केला होता. राम पक्ष हा इस्त्रायलमधील अरब लोकांचे नेतृत्व करतो. यहुदी बहुल असलेल्या या देशात अरब मुस्लिमांची लोकसंख्या जास्त नाहीय. त्यांच्यातील अनेकजण वेगवेगळ्या पक्षाला मतदान करतात. राम पक्षाला पाच जागांवर विजय मिळणे हे पहिल्यांदाच घडले आहे.

 

News English Summary: The conflict with the Mossad has caused a major upheaval in Israel. With the change of president, the era of Prime Minister Benjamin Netanyahu, a friend of Narendra Modi, is now over in Israel. Opposition parties have stated they will not run in the by-elections. This will force Netanyahu to step down for many years.

News English Title: Israel’s opposition leader on Thursday moved closer to unseating Prime Minister Benjamin Netanyahu news updates.

हॅशटॅग्स

#Israil(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x