डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती

मुंबई, ३० डिसेंबर: ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याआधी सुद्धा शीतल आमटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच त्यांचा मृत्यूबद्दल घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे. (Sheetal Amte Karajagi suicide case report what police said)
शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाला तब्बल महिनाभरानंतरही पोलीस तपासात अल्प प्रगती पाहण्यास मिळाली आहे. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शीतल आमटे यांचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचा निष्कर्ष प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे. व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पण, डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची माहिती ही त्यांनी दिली.
शीतल यांचा मृत्यू झाला त्या खोलीतून नेक्युरोन इंजेक्शनचे अॅम्पुल व सिरिंज मिळाले आहे. शीतल यांच्या उजव्या हातावर इंजेक्शनचे मार्क दिसून आले आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅबलेट, मुद्देमाल, व्हिसेरा ताब्यात घेतला आहे. या सर्व वस्तू रासायनिक परिक्षणकामी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर व नागपूर या ठिकाणी पाठविल्या आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी पाठविल्या आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.
News English Summary: New information has come to light regarding the suicide of Dr. Sheetal Amte-Karjagi, granddaughter of the late Baba Amte and CEO of Maharogi Seva Samiti. Earlier, shocking information has come to light that Sheetal Amte had attempted suicide. Also, the possibility of an assassination attempt has been ruled out.
News English Title: Sheetal Amte Karajagi suicide case report what police said news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL