महत्वाच्या बातम्या
-
चीनी कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी
आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली चिनी नागरिक, कंपन्या आणि त्यांचे भारतीय सहकारी यांच्या तळांवर छापे टाकले आहेत. मंगळवारी दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्राम येथे आयकर विभागाने २१ ठिकाणी छापे टाकले. काही भारतीयांच्या मदतीने या चिनी नागरिकांनी अनेक शेल कंपन्या बनवल्या आणि हवाला आणि मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अवैध व्यवहार केल्याचा आरोप आहे. अधिसूचना मिळाल्यानंतर छापोमारीला सुरुवात करण्यात आल्याचं आयकर विभागाने सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
१७ हजार कोटींचा निधी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा आनंद - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज या योजनेची सुरुवात केली. कृषी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी सवलतीच्या कर्जासाठी एक लाख कोटी रुपयांच्या निधीतून कृषी पायाभूत सुविधा निधीच्या स्थापनेला केंद्राने जुलैमध्ये मान्यता दिली. शेतक-यांच्या उत्पादनांच्या चांगल्या देखभालीसाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा निधी उभारण्याची घोषणा केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 20 लाख कोटींच्या स्वयंपूर्ण पॅकेजदरम्यान ही घोषणा केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Covid Vaccine | १० कोटी गरिबांना लस देण्यासाठी बिल गेट्स यांचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार
लवकरात लवकर कोरोना लस (Corona vaccine) तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) आणखी एक पाऊल उचललं आहे.
3 वर्षांपूर्वी -
२९०० कोटीचं कर्जप्रकरण, अनिल अंबानी समूहाचं मुख्यालय YES बँक ताब्यात घेणार
रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या संकटात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेनं त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रातील बँक ‘येस बँके’नं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं आहे. तसंच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचं १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.
3 वर्षांपूर्वी -
करदात्यांना दिलासा! इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली
आयकर विभागाने कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आयकर भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत २ महिन्यांपर्यंत वाढविली आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सन २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की, कोरोनामुळे सुरू असलेल्या अडचणींमुळे, करदात्यांना दिलासा मिळावा म्हणून ३१ जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या आर्थिक वर्षासाठी (AY2019-20) आर्थिक वर्षातील आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला केंद्राकडून GST परताव्याचे १९ हजार २३३ कोटी रूपये मिळाले
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारडून महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आलायं. जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये देण्यात येत आहेत. २०१९-२० चा हा जीएसटी परतावा देण्यात आलाय.
3 वर्षांपूर्वी -
डिझेलचे दर पुन्हा वाढले, लॉकडाउनमधील प्रवास महागणार..नवीन दर पाहा
तेल कंपन्यानी पेट्रोलचे दर स्थिर ठेवून डिझेलचे दर वाढविले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात डिझेलचे दर नऊ वेळा वाढविले आहेत. दिल्लीत डिझेलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. सातत्याने होणाऱ्या किंमत वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण फळं आणि भाज्यांमधील इतर खाद्यपदार्थ महाग होत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
थिएटर मालकांकडून केंद्र सरकारकडे नियमावली सादर, अनलॉक ३ मध्ये चित्रपटगृहांना सूट मिळणार?
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा कळस गाठत आहे. गेल्या २४ तासांत 48,916 नव्या रुग्णांची भर पडली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासांत ७५७ रुग्णांचे निधन झाले आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 13,36,861 वर पोहोचला आहे. यामध्ये 4,56,071 एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 8,49,431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, देशभरात 31,358 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार, दक्षिण भारतात प्लांट सुरु होणार
जगभर प्रसिद्ध असलेल्या आयफोनने चिनमधील उत्पादन बंद करून भारतात उत्पादन सुरू केलं आहे. आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार असून देशात प्रथमच टॉप मॉडेल तयार करण्यात येत आहे. म्हणजे, अॅपलने चीनमधून गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमधील परकीय गुंतवणुक सांगताच नेटिझन्स म्हणाले, देशात नाही अंबानी समूहात
अमेरिका भारत बिझनेस कॉउन्सिल इंडिया आयडिया समिट मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं. यावेळी मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर सर्वाधिक भर देत जगाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
आयात वस्तू कुठल्या देशातील ते दाखवा, ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या अडचणी वाढणार
ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकल्या जात असलेल्या उत्पादनांवर त्यांच्या मूळ देशाची माहिती/उल्लेख येत्या काही दिवसात देणे अनिवार्य होऊ शकतं. १५ ऑगस्टच्या आधी हा नियम अमलात येण्याची शक्यता आहे. स्वतः केंद्र सरकारने तशी माहिती उच्च न्यायालयाला दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणानंतर रेल्वे स्थानकांचा लिलाव करण्याची मोदी सरकारची योजना
देशातल्या १५१ रेल्वे गाड्यांचं खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर आता मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यानंतर या स्थानकांचा लिलाव करण्याची सरकारची योजना आहे. मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स एँड इंडस्ट्रीकडून (एमसीसीआय) आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबद्दलची माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
सरकारी बँका आणि कंपन्यामधील भागीदारी विकण्याच्या तयारीत मोदी सरकार
सरकारकडून सरकारी कंपन्यांबरोबरच सरकारी इन्शूरन्स कंपन्या आणि बँकांच्या खाजगीकरणाची तयारी करण्यात आली आहे. सीएनबीसी आवाजला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, ‘LIC आणि एक नॉन लाइफ इन्शूरन्स कंपनी सोडून सर्व इन्शूरन्स कंपन्यामधील संपूर्ण भागीदारी हप्त्या-हप्त्याने सरकार विकू शकते. तर दुसरीकडे बँकांच्या खाजगीकरणची देखील योजना आहे. यावर पीएमओ, अर्थ मंत्रालय आमि नीती आयोगाचे एकमत झाले आहे. त्याचप्रमाणे कॅबिनेट ड्राफ्ट नोट देखील तयार करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
जपानचे ५७ जपानी कंपन्यांना चीनमधले प्लांट जपानमध्ये हलवण्याचे आदेश
चीनच्या विस्तार वादाला आणि युद्धखोर नीतीला संपूर्ण जग कंटाळ्याचं पाहायला मिळत आहे. केवळ भारतच नव्हे तर तैवान आणि जपानसारखे देश सुद्धा स्वतःला चीनपासून असुरक्षित समजू लागले आहेत. चीनचे अमेरिकेसोबत देखील संबंध अत्यंत टोकाला गेल्याचचं पाहायला मिळत आहे. जगभरातील देश कोरोनाचं उगमस्थान असलेल्या चीनपासून स्वतःला आर्थिकदृष्ट्या दूर ठेवणं पसंत करत असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळालं आहे. त्यात आता जपानने जे पाऊल उचललं आहे त्यावरून चीन पुरता हादरण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Google भारतात फूड डिलिव्हरी सेवा सुरु करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
डिजीटल शिक्षण, रिलायन्सकडून Jio Glass सेवा लाँच
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.
3 वर्षांपूर्वी -
मोठी घोषणा! जिओ पुढील वर्षी लाँच करणार 5G नेटवर्क
संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं 5G नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाँच करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर भाष्य केलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावेळी रिलायन्सनं जिओ मीट द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
Google चा मोठा निर्णय, Jio App मध्ये तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान कमावले आहे. मुकेश अंबानी यांनी टेस्लाच्या एलन मस्क यांना देखील मागे टाकले आहे.ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या मते, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ७२.४ अब्ज डॉलर झाली आहे. याआधी मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात मोठे गुंतावणूकदार आणि हाथवे बर्कशायरचे वारेन बफे यांची जागा घेतली होती, जे की आठव्या स्थानावर होते.
3 वर्षांपूर्वी -
फेसबुकनंतर गुगल Jio App Platform मध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी काल मोठी आनंदाची बातमी दिली. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज ही मोठी घोषणा केली. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
-
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
-
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
-
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
-
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
-
RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता
-
Abbott India Share Price | 'ऍबॉट इंडिया'च्या गुंतवणुकदारांना मिळणार बंपर लाभांश, होणार मजबूत फायदा
-
Repro India Share Price | एका आठवड्यात 'रेप्रो इंडिया' कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
-
Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा
-
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा