12 December 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Vikas Ecotech Share Price | 3 रुपयाचा शेअर गुंतवणूकदारांचा विकास करतोय, विकास इकोटेक शेअरने 3 वर्षात 500% परतावा दिला, पुन्हा तेजीत

Vikas Ecotech Share Price

Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक कंपनीने नुकताच हरित पर्यावरण संबंधित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभारण्यासाठी एआरएम इस्टेट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत व्यापारी करार केला आहे. एआरएम इस्टेट प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट क्षेत्रात व्यवसाय करते.

ही कंपनी देशाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्ली एनसीआर भागात व्यावसायिक आणि निवासी प्रकल्प उभारण्याचे काम करते. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने या बांधकाम क्षेत्रातील कंपनीसोबत करार केला असून, त्यात 75 टक्के गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.61 टक्के वाढीसह 3.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास इकोटेक कंपनी या हरित पर्यावरण संबधित प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी गुरुग्राममध्ये दोन जागेवर व्यावसायिक इमारतींचे बांधकाम आणि विकास कामासाठी संपूर्ण पैसे खर्च करणार आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने जुलै 2003 साली जमीन संबंधित व्यवहारात 15 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. आता ही कंपनी दिल्ली एनसीआरमध्ये आणि आजूबाजूला अनेक ठिकाणी जमीन खरेदी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यानंतर कंपनी प्रकल्प विकास करताना त्यात 22.5 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

विकास इकोटेक लिमिटेड ही कंपनी पायाभूत सुविधा विकास संबंधित प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. नुकताच या कंपनीला 20 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. यात राजन रहेजा समूहाच्या प्रिझम जॉन्सन लिमिटेड कंपनीला कोळसा पुरवठा करायचा आहे. पुढील 15 दिवसांत या ऑर्डरची पूर्तता करण्याचे काम सुरू होईल, आणि 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण होईल.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.1 टक्क्यांच्या वाढीसह 3.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 16 वर्षांत, विकास इकोटेक कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीपासून आतापर्यंत हा स्टॉक 500 टक्के वाढला आहे. विकास इकोटेक या कंपनीचे बाजार भांडवल 346 कोटी रुपये आहे. आणि शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Ecotech Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x