15 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Suzlon Share Price | अवघ्या 3 महिन्यांत 118% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्समध्ये हालचाल काय? सपोर्ट लेव्हल आणि तज्ज्ञांचं मत पहा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 118 टक्के नफा कमावून दिला आहे. 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 18.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

अवघ्या तीन महिन्यात शेअरची किंमत तब्बल 117.61 टक्के वाढली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 5 टक्के वाढला आणि दोन दिवसांची मंदी संपली. सुझलॉन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 22,831 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 18.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टेक्निकल विश्लेषण :

जर आपण सुझलॉन एनर्जी स्टॉकच्या टेक्निकल चार्टचा आढावा घेतला तर आपल्याला समजेल की, सुझलॉन एनर्जी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 56.2 अंकवर आहे. यावरून कळते की हा स्टॉक जास्त ओव्हरबाँट ही नाही, किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ही नाही. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा बीटा 1.6 वर आहे, जे खूप उच्च अस्थिरतेचे निर्देशक आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक आपल्या 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवस, सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र 5 दिवस, आणि 10 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.

तज्ञांचे मत आणि लक्ष किंमत :

Tips Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉकच्या दैनंदिन चार्टवर 19.4 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि स्टॉक सध्या मंदीच्या स्थितीत आहे. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी तत्काळ या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर पडावे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकने 8 रुपये किमतीवरून चांगली उसळी घेतली होती. आता हा स्टॉक 20.80 रुपये या नजीकच्या उच्चांक पातळीला स्पर्श करून 17-18.50 रुपये किमतीच्या झोनमध्ये राहण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 08 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x