21 September 2024 6:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

Federal Bank Share Price | केवळ बँक FD मध्ये पैसा गुंतवू नका, बँक शेअर्सचा सुद्धा विचार करा, 5 वर्षाचं व्याज एका वर्षात मिळेल

Federal Bank Share Price

Federal Bank Share Price| फेडरल बँक स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. फेडरल बँकने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती, त्याची एक्स-डेट शुक्रवारी 11 ऑगस्ट 2023 रोजी नियोजित आहे.

फेडरल बँकेने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणुकदारांना 2 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या शेअरवर 1 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 16 जानेवारी 2023 रोजी फेडरल बँक स्टॉक 143.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के वाढीसह 133.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी फेडरल बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांची वाढीसह ट्रेड करत होते. नंतर हा स्टॉक 1.70 टक्के वाढीसह 134 55 रुपये किमतीवर क्लोज झाला होत. फेडरल बँकेच्या शेअरबाबत तज्ञामध्ये उत्सुकता आहे. आणि नुकताच प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी फेडरल बँक स्टॉकवर 175 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. जे लोक बँकेच्या एफडी मध्ये गुंतवणूक करून व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी दीर्घ कालीन दृष्टिकोन ठेवून फेडरल बँक स्टॉक खरेदी करावा, असे तज्ञ म्हणतात.

निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल फर्मच्या मते फेडरल बँक स्टॉक पुढील 184 रुपयेवर गेला तर आश्चर्य वाटेल नको. जून 2023 तिमाहीत फेडरल बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. या तिमाहीत बँकेचा नफ्यात 29 टक्क्यांची वाढ झाली असून, बँकेने 854 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत फेडरल बँकेने 661 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जून 2023 तिमाहीत फेडरल बँकेच्या एकूण उत्पन्नात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या बँकेने जून तिमाहीत तब्बल 5,757 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत फेडरल बँकने 4,081 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

जून 2023 तिमाहीत फेडरल बँकचे व्याज उत्पन्न 3,629 कोटी रुपयेवरून वाढून 5,025 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. जून 2023 तिमाहीत फेडरल बँकेने मालमत्तेच्या दर्जात मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. मागील एका वर्षात फेडरल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मागील वर्षी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी हाताळत आहे. राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध होते. रेखा यांनी 31 मार्च 2023 पर्यंत फेडरल बँकेचे एकूण 7,27,13,440 शेअर्स धारण केले आहे, ज्यांचे एकूण भाग भांडवलाशी प्रमाण 3.48 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

#Federal Bank Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x