GK - मुघल साम्राज्याचा उदय
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे मुघल साम्राज्याचा उदय. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर मुघल साम्राज्याचा उदय याबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
मुघल साम्राज्याचा उदय
बाबर (सन 1526 ते 1530)
- बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होय. दिल्लीमध्ये रब्राहीम लोदी सत्तेत असतांना पंजाबच्या प्रांताधिकारी दौलतखान लोदीने बाबरला भारतात आक्रमण करण्यास पाचारण केले.
- बाबरने सन 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या साम्राज्याला राजपुतान्यातील राजपूतांनी आव्हान दिले.
- सन 1527 मध्ये खुनव्याच्या लढाईत बाबरने संघटीत राजपुतांचा पराभव केला आणि आपली दिल्लीची सत्ता मजबूत केली.
हुमायूम (सन 1530 ते 1555)
- बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूम सत्तेत आला.
- बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.
- यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.
- पुढे हुमायूमला सत्तेविना भटकंती करावी लागली.
शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554)
- सन 1540 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशहा सुरीने हुमायूमचा करून सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.
जमीन महसूल सुधारणा:
- शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.
रस्ते बांधणी:
- राजधानीला जोडणार्या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले. दिल्ली अमृतसर राजमार्ग त्याच्याच काळात पूर्ण झाला.
चलन व्यवस्था:
- त्याने रुपया हे नाणे सुरू केले.
टपाल व्यवस्था:
- राजधानी मध्ये टपाल व्यवस्था सुरू केली.
हुमायूम (सन 1555 ते 1556)
- हुमायूमला शेरशहा सूरी सत्तेत असेपर्यंत काहीही करता आले नाही.
- शेरशहा सूरीच्या मृत्यूनंतर मुहम्मद आदिलशहा सत्तेत आला. हा विलासी राजा होता.
- सन 1555 मध्ये सिकंदर सूरी चा पराभव करून सूरी वंशाची सत्ता संपुष्टात आणली आणि दिल्लीवर पुन्हा आपला ताबा मिळविला. परंतु, त्यास ही सत्ता फार दिवस उपभोगता आली नाही.
- सन 1556 मध्ये जिन्यावरुन घसरून मरण पावला.
अकबर (1556 ते 1606)
- सम्राट अकबराने अल्पावधीमध्येच अर्ध्या भारतावर आपली सत्ता स्थापित केली.
- राणा प्रतापच्या प्रखर विरोधामुळे मेवाड मात्र त्यास आपल्या साम्राज्यात सामील करता आले नाही.
- अकबर हा सहष्णू राजा होता.
- सर्व धर्माच्या लोकांना विश्वासात घेवून त्याने आपला साम्राज्य विस्तार केला. यामुळे तो सर्व लोकांमध्ये प्रसिद्धीला आला होता.
महत्वाच्या सुधारणा:
- त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.
- सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.
- हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.
- बालहत्या प्रथा बंद केली.
- सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.
कला व विद्याप्रेमी:
- अकबराच्या काळात आगर्याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.
- अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.
- अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.
- तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.
- अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.
जहांगीर (1606 ते 1627):
- अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सत्तेमध्ये आला. त्याने अकबराचे राज्य विस्तारचे धोरणपुढे चालू ठेवले.
- त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.
- मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.
- काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.
- जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.
शहाजहान (सन 1627 ते 1658):
- जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान गादिवर आला. त्याने दक्षिणकडे आपला राज्यविस्तार केला.
- त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.
- अशाप्रकारे दक्षिणेकडे आपली सत्ता प्रस्तापित केली.
- शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आली लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.
औरंगजेब (सन 1658 ते 1707):
- सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला असता त्याने शहाजहानला नजरकैदेत टाकून स्वत:ला सम्राट घोषित केले.
- औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. औरंगजेब हा सुन्नी विचाराचा असल्यामुळे व संशयी स्वाभावामुळे बरेचशे सरदार व अधिकारी दुखावल्या गेले. याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.
- औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.
- शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.
- सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर-दूसरा यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले. अशाप्रकारे मुघल साम्राज्य संपूष्ठात आले.
Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.
Subject English Searching Title: Mughal Samrajya cha uday study for competitive exams in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN