GK - स्वदेशी चळवळ
स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे स्वदेशी चळवळ. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर स्वदेशी चळवळीबद्दलची माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.
स्वदेशी चळवळ:
- 20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.
- सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.
- 16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.
- कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.
- बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.
- परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.
- अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.
- शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली, त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की ‘स्वराज्य’ हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहेत.
- खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.
- विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.
- परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.
- समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.
- सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.
- वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकत्र्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्याथ्र्यांना मारझोड करण्यात आली.
- सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.
- जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.
- अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.
- बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.
- मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय
- अधिकार्यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.
- या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.
- इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्या इंग्रज विदुषी एनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी ‘इंडियन होमरुल लीग’च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले.
- युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.
- त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
Important Note: Study most important Current Affairs and general knowledge questions with answers that are highly expected to be asked in the MPSC Recruitment, UPSC Civil Services, Staff Selection Recruitment, Railway Recruitment Board, Banking Recruitment, State Police Recruitment, Army Recruitment and any government recruitment Prelims and Main exams.
Subject English Searching Title: Swadeshi Chalval study for competitive exams in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA