23 September 2021 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Health First | तुमचे डोळे फडफडतात | समस्या आरोग्याशी निगडित आहे - नक्की वाचा

Reasons of eye twitching

मुंबई, १५ सप्टेंबर | डोळा लवणे म्हणजे शकून किंवा अपशकून असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण डोळा लवणे हे तसं फारच त्रासदायक असतं. डोळ्यांमधला मज्जातंतू किंवा स्नायू हलायला लागल्यामुळे तुमचा डोळा लवायला सुरुवात होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तुमचे डोळे फडफडतात, समस्या आरोग्याशी निगडित आहे – What is reasons of eye twitching in Marathi :

डोळे लवण्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. पण बऱ्याच वेळा तुमचा डोळा हा लवतो त्याला म्योकिमिया म्हणतात. यामध्ये फक्त एकाच डोळ्याची पापणी फडफडते, आणि काही वेळानंतर आपोआप तुमचा डोळा व्यवस्थित होतो. शरिरातले इतर स्नायू नियंत्रणाबाहेर गेल्यावर जसं होतं, तसंच डोळ्यांच्या बाबतही होतं, आणि डोळा लवायला लागतो. डॉक्टरांच्या मते हा प्रकार काही गंभीर नाही.

पण ब्लेफारोस्पास्म हा प्रकार मात्र गंभीर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. डोळ्याच्या दोन्ही पापण्या जास्तच जोरात फडफडत असतील आणि हा प्रकार वाढतच असेल तर तुमचे डोळे जायची शक्यता आहे. त्यामुळे लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा आणि उपचार घ्या.

१. डोळ्यांचे स्नायू अनियंत्रित झाल्यामुळे डोळा फडफडू शकतो. सामान्यपणे हा त्रास काही वेळात आपोआप दूर होतो. मात्र दीर्घकाळापर्यंत डोळ्याचे फडफडणे सुरू राहिले तर हा त्रास डोळ्यांच्या किंवा चेहर्यांच्या स्नायूंमुळेही होऊ शकतो.

२. डोळ्यांचे फडफडणे हे अनेक प्रकारचे असते. त्यामध्ये ‘बिनाईन आयलीड ट्विच’ हा एक प्रकार असतो. त्याला आयलीड मायक्रोमिनिया या नावानेही ओळखले जाते. सामान्यपणे एक डोळा पापण्यांच्या छोट्या स्नायूंच्या आकुंचानामुळेदेखील फडफडतो. अनेकदा कुठल्याही इलाजाशिवाय फडफडणे बंद होते.

Eye twitching Causes and treatment in Marathi:

काय आहेत डोळे लवण्याची कारणं ?
1) ताण: कामाच्या जास्त ताण हे डोळे लवण्याचं मुख्य कारण असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
2) कमी झोप: रात्रीची झोप कमी झाली तरीही डोळे लवण्याचं प्रमाण वाढू शकतं. कामाच्या वेळी लक्ष केंद्रीत करताना डोळ्यांचा वापर जास्त होतो. त्यातच झोप कमी झाली असेल तर पापणी फडफडते.
3) कॅफेन: कॅफेन म्हणजेच चहा आणि कॉफीमध्ये असलेली उत्तेजक द्रव्य. तुम्ही चहा आणि कॉफीचं जास्त सेवन करत असाल तर शरीरात कॅफेनचं प्रमाण वाढत आणि कॅफेनमुळेही डोळे लवण्याचा त्रास होतो.

बिनाइन इसेंशिअल ब्लेफारोस्पॅझ्म :
यामध्ये डोळ्यांच्या आजूबाजूला असणार्या स्नायूंमध्ये आखडलेपण येते. याची सुरुवात डोळे जास्त फडफडल्याने होते. अनेकदा गंभीर स्थितीमध्ये पापण्या काही तासांसाठी बंद होतात.

हॅमीफेशिअल स्पॅझ्म:
चेहर्याच्या एका भागातील स्नायू तसेच पापण्यांच्या स्नायूंमध्ये होणार्या आकुंचनामुळे होमीफेशिअल स्पॅझ्मची समस्या निर्माण होते. चेहर्यापर्यंत जाणार्या स्नायूंच्यामज्जातंतूंमध्ये काही कारणाने अनियमितता येते त्यामुळे असे होते.

कॉर्नियामध्ये खाज निर्माण करणार्या घटकांमुळे देखील डोळे फडफडू शकतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: What is reasons of eye twitching in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(753)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x