2 June 2023 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार

Senior Journalist Ravish Kumar

Ravish Kumar | संसदेचे सदस्यत्व गेल्यानंतर राहुल गांधी शनिवारी प्रथमच प्रसार माध्यमांसमोर आले. या पत्रकार परिषदेत राहुल यांनी आपण शांत बसणार नसल्याचे कडक शब्दांत सांगताना भाजपाला थेट पुढचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा काय असेल याचे संकेत दिले आहेत. गौतम अदानींच्या मुद्द्यावरून ते मोदी सरकारला घेरत राहतील, हे राहुल त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते आहे.

मी यांना घाबरत नाही
शनिवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी गौतम अदानींबाबत त्या २० हजार कोटीवरून केलेल्या प्रश्नामुळे मोदी सरकार घाबरले आहे. अदानींबद्दल मी एकच प्रश्न विचारला होता. राहुल यांचे हे विधान संसदेत बोलता येणार नसले तरी ते मोदी सरकारला गौतम अदानींबाबत प्रश्न विचारत राहतील, असे संकेत मिळाले आहेत. याशिवाय राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्या तील संबंधांवर प्रश्नउपस्थित केले.

अशा प्रकारे घेऊ शकता फायदा
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, राहुल गांधी त्यांच्यावरील या कारवाईमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा कसा घेणार? भाजपने वर्तवलेल्या अंदाजानुसार राहुल गांधी आधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आणि नंतर इतर राज्यांच्या निवडणुकीत भावनिक म्हणजे व्हिक्टीम कार्ड खेळू शकतात. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधानांविरोधातील या वातावरणाचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असं म्हटलं जातंय. तसेच भाजपने हा मुद्दा OBC समाजाशी जोडल्याने भाजपाचं समाज माध्यमांवर हसू झालं आहे हे देखील पाहायला मिळतंय.

निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चिकसी OBC नेते होतील?
वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी त्यांचा प्रसिद्ध युट्युब चॅनेलवरून मोदी-अदानी विषयाला भाजपने OBC समाजाशी जोडल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी यावर बोलताना असं देखील म्हटलं आहे की, “आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चिकसी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल”.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Senior Journalist Ravish Kumar criticized BJP over connecting Rahul Gandhi issue with OBC check details on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#Senior Journalist Ravish Kumar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x