नवी दिल्ली : मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदुषण होते का त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. कारण पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत आणि त्यामुळे ध्वनीप्रदुषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे संबंधितांकडून करण्यात आली होती.
दाखल झालेल्या तक्रारीची दाखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने याबाबत तपास करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. तक्रारदाराने या मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होते आणि त्यामुळे हरित लवादाच्या नियमांच्च उल्लंघन होत असल्याच या तक्रारीत नमूद केलं आहे. दिल्लीस्थित अखंड भारत मोर्चा या स्वयंसेवी संस्थेने ही तक्रार दाखल केली होती. या परिसरात शाळा तसेच रुग्णालये असलेल्याने त्यामागील गांभीर्य तक्रारदाराने मांडले आहे.
भारत मोर्चा या स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारी नुसार या भोंग्यांचा आवाज ठरवून दिलेल्या मर्यादीत डेसिबल पेक्षा जास्त असल्यामुळे त्यात हरित लवादाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे असं म्हटलं आहे. त्यानंतर झालेल्या सुनावणीत एनजीटीचे अध्यक्ष जस्टीस आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठानेही दिल्ली प्रदुषण मंडळावर नाराजी व्यक्त केली आहे आणि तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
