10 May 2025 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC NTPC Green Energy Share Price | 52% रिटर्न मिळेल, स्वस्त शेअरवर ब्रोकिंग फर्म बुलिश, फायदा घ्या - NSE: NTPCGREEN JP Power Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार; जेपी पॉवर शेअर फोकसमध्ये, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER HUDCO Share Price | तब्बल 72 टक्के परतावा मिळेल; PSU शेअर खरेदी करा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

काँग्रेसचे संकटमोचक देखील ईडीच्या कचाट्यात; डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी

D K Shivkumar, ED Notice, ED Office, ED Summons, Congress

नवी दिल्ली : काँग्रेसचे ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावरच संकट ओढावले आहे. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले असून चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस जेडीएस सरकार पाडताना डी. के. शिवकुमार यांनी भारतीय जनता पक्षातील धुरंदरांचा धूर काढला होता आणि त्यानंतर ते भविष्यात भाजपाला धोका निर्माण करू नये म्हणून आधीच त्यांचा बंदोबस्त करण्यात येत असल्याचं म्हटलं जातं आहे.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ आता कर्नाटकातील काँग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी होणार आहे. शिवकुमार यांची कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख आहे आणि कर्नाटकातील फुटलेल्या काँग्रेस आमदारांचा देखील त्यांनी मुंबईत येऊन घाम काढला होता. अक्षरशः डी. के. या नावाची देखील त्यांनी धास्ती घेतली होती. परंतु आता त्यांच्यावरच ईडीच्या चौकशीचे संकट ओढावले आहे. गुरूवारी कर्नाटक हाय कोर्टाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेत त्यांनी ईडीचे समन्स रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली असून आता त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी जावे लागणार आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) ते ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच कथित आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवकुमार यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वी आयकर विभागाने शिवकुमार यांच्या दिल्लीतील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यामध्ये ८ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीने डी.के.शिवकुमार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्याविरोधात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या