2 May 2025 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

भारतीय सैन्याकडून चीनचे ५ सैनिक मारले गेले, ११ सैनिक जखमी

India China, Ladakh Border Clashes

लडाख, १६ जून: लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात काही महिन्यांपासून तणवाचं वातावरण असताना हिंसक झडप झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये एक भारतीय लष्करी अधिकारी आणि २ जवान शहीद झाले आहेत. गलवान खोऱ्यात ही झडप झाली. यामध्ये चीनचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.

गलवान खोऱ्यात १५ जूनपासून चर्चा सुरु होती. ब्रिगेडियर कमांडर, कमांडर ऑफिसर लेवलच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरु होती. गलवान खोऱ्यातील सैनिकांना माघारी पाठवण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती करण्यासाठी चर्चा झाली. पण आता या झडपनंतर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.

दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख नरवणे यांची बैठक बोलावली होती.

सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकार प्रयत्न करत आहेत. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय सैनिकांनीच दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच भारतीय सैनिकांनीच आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.

 

News English Summary: Violent clashes between India and China have been raging in Ladakh for months. In which one Indian Army officer and 2 jawans have been martyred. The clash took place in Galwan valley. Five Chinese soldiers were killed and 11 others were injured.

News English Title: Five Chinese soldiers were killed and 11 others were injured at Ladakh News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या