महत्वाच्या बातम्या
-
चिनी सैनिकांच्या हातात तलवारी-भाल्यासारखी हत्यारे | चिनी युद्ध सदृश्य वातावरण करतोय
सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्ने केला असून गलवानसारखा धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय चौकीला धारधार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये पुन्हा तणाव वाढला | भारतानं वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा चीनचा आरोप
मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाग्रस्त स्थिती आहे. 29 आणि 30 ऑगस्टला रात्री चीननं पँगोग त्सो इथे घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी तो हाणून पाडल्यानंतर पुन्हा एकदा 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर गोळीबार झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाची आयटी सेल कामातून गेली बेकार झाली | बनावट आयडीने माझ्यावर हल्ले
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्याच पार्टीच्या आयटी सेलवर निशाणा साधला आहे. भाजपचे आयटी सेल बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल करीत आहे. जर माझे समर्थक असे करण्यास सुरूवात करतील तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Auto world | हैदराबादच्या स्टार्टअपचा कमाल | ७ रुपयांत १०० किमी | ५० हजारात बाईक
हैदराबादची इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनी Atumobile प्रायव्हेट लिमिटेडने एक जबरदस्त मायलेज देणारी इलेक्ट्रीक बाईक बाजारात आणली आहे. या बाईकचे नाव आहे Atum 1.0. या बाईकची बेस प्राईजही ५० हजार रुपये आहे. Atum 1.0 ही ICAT ने मंजुरी दिलेली कमी स्पीडची इलेक्ट्रीक बाईक आहे. यामुळे या बाईकसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, तसेच ड्रायव्हिंग लायसनचीही गरज राहणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा विस्फोट | एकाच दिवसात तब्बल 90 हजार 802 रुग्णांची नोंद
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखांहून अधिक झाली आहे. तर, एकाच दिवसात आज तब्बल 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख 04 हजार 614 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद | १०८९ रुग्णांचा मृत्यू
भारतात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ४० लाख २३ हजार १७९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६९ हजार ५६१ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचं सत्य | तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय | मित्रांना पुढे घेऊन जायचंय - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या एकूण धोरणांवरच राहुल गांधी यांनी हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम खाजगीकरण, कोविड केवळ एक कारण आहे, सरकारी कार्यालय कर्मचारी मुक्त करायची आहेत, तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय आणि मित्रांना पुढे घेऊन जायचंय, असा शाब्दिक प्रहार राहुल गांधींनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
JEE - NEET | महाराष्ट्र सह 6 राज्यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना NEET-UG आणि JEE Mains 2020 च्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्र सह देशातील 6 राज्यांच्या मंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र आज कोर्टाने त्या फेटाळून लावल्या आहे. 17 ऑगस्ट दिवशी सुनावणी करताना कोर्टाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार, देशभर जेईई मेन्स आणि नीट 2020 ची परीक्षा होईल असं म्हटलं होतं. दरम्यान देशात 1 सप्टेंबर पासून जेईई मेन्स परीक्षा सुरू झाली आहे. त्या 6 सप्टेंबर पर्यंत घेतल्या जातील.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कोणाच्या बापाची आहे का | भाजप खासदाराचं मुख्यमंत्र्यांना मेन्शन करत वक्तव्य
कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकाबाजूने चीन तर दुसरीकडून पाकिस्तानही हल्ला करणार | बिपीन रावत यांचा गंभीर इशारा
लडाखमध्ये चीन युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे भारताने अरुणाचलप्रदेशसह एलएसीवरील भागात सैन्य कुमक वाढविण्यास सुरुवात केली असून सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी मोठा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली | नेपाळ आणि श्रीलंका'वर लक्ष ठेवा
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारताने श्रीलंका आणि नेपाळमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तसेच चीनच्या घुसखोरीवरही नजर असली पाहिजे. भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली सुरु आहेत. हा प्रदेश चीन सर्व बाजूंनी घेरत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील रेल्वे रुळालगतच्या झोपड्या हटवा | सुप्रीम कोर्टाचे आदेश
रेल्वेमार्गाजवळील झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे आदेश देताना काही निर्देशही दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे की, राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. या आदेशात कोणत्याही न्यायालयाने झोपडपट्टी हटविण्यावर स्थगिती देऊ नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
6310 पदांवर नोकरभरतीची सुवर्णसंधी | थेट मुलाखतीनं मिळणार नोकरी
राजस्थान सरकारने 6000हून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी(Community health officer)पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात. भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी किंवा संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी
देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकने भाजप नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींचा कैश लेस भारत | खरं तर कामगार-शेतकरी-छोटे व्यापारी मुक्त भारत आहे - राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरून हल्लाबोल सुरू केला आहे. जीडीपीची ऐतिहासिक घसरण, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवत राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ सुरू केली असून, दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयावरून टीकेची तोफ डागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
२४ तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या | जगभरातील सर्व देशांना मागे टाकलं
गुरूवारी भारतात कोरोनाबाधितांचा आकडा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित ८३,८८३ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात एवढे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे. यानुसार आतापर्यंत भारतात ३८,५३,४०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ८.१५ लाख केस ऍक्टिव आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीन तणाव | भारताचे लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल
भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे. पँगाँग त्सो तलाव भागाच्या दक्षिणेकडील अतीमहत्त्वाच्या पोस्टवर भारताने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पँगाँग त्सो तलाव परिसरातली जैसे थे स्थिती बदलण्याचा पीएलएचा डाव हाणून पाडल्यावर आता भारताने इथे तैनात वाढवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हे अकाऊंट मोदींच्या पर्सनल वेबसाईटशी संलग्न आहे. याबाबत कंपनीला कल्पना आली असून अकाऊंट सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कंपनीने पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे. मोदींच्या ट्विटर अकाऊंटला 2.5 मिलियन्स पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विरोधक संसदेत मोदी सरकारला प्रश्न विचारू शकणार नाहीत | शशी थरूर यांचं भाकीत खरं ठरलं
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. परंतु पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आला आहे. तसंच प्रायव्हेट मेंबर बिलसाठी कोणताही विशेष दिवस ठेवण्यात आलेला नाही. याव्यतिरिक्त शून्यप्रहरावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेशात शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या
मध्य प्रदेशातील शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपींनी केलेल्या गोळीबारात साहू यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरू पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS