महत्वाच्या बातम्या
-
देशात कोरोनाचा कहर पुन्हा वाढतोय | २४ तासांतील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर
गेल्या तीन दिवसात सलग 75 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा विस्फोट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत सलग तिसऱ्या दिवस 76 हजार 472 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचं कोरोनामुळे निधन
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्यानं वाढत आहे. भारतात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत ७७ हजार २६६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. मागील दोन दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्तने वाढत आहे. गेल्या आठवड्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ६० ते ६५ हजाराने वाढत होती.
5 वर्षांपूर्वी -
...ती ऍक्ट ऑफ मास्टर ऍक्टर | अर्थमंत्र्यांच्या टिपणीवर समाज माध्यमांवर हास्य जत्रा
करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (Act of God) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केले. मात्र या बैठकीमध्ये निर्मला यांनी ‘देवाची करणी’ म्हणजेच Act of God चा उल्लेख केल्यानंतर गुगलपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. ट्विटर आणि फेसबुकवरही याचसंदर्भातील चर्चा सुरु होत्या.
5 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक २०२० पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणूक पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. जोपर्यंत बिहार राज्य करोनामुक्त होत नाही तोपर्यंत निवडणूक घेतली जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळून लावताना अपरिपक्व असल्याचं म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस सुप्रीम कोर्टाचा नकार
मोहरम मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले,”जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला करोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे,” असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात ऑक्सफर्डची लस घेणाऱ्या स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम | साइड इफेक्ट नाहीत
ऑक्सफोर्ड कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सच्या दुसऱ्या टप्प्यातील परिणाम नॉर्मल असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दिली आहे. या चाचणीसाठी पुढे आलेल्या 2 स्वयंसेवकांपैकी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. 32 आणि 48 वर्षीय दोन स्वयंसेवकांना कोविडशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. पुणे स्थित भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी या लसीचे उत्पादन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक | कोरोना लसीवरून राहुल गांधींचं टीकास्त्र
देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 33,10,235 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 75,760 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,023 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 60,472 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर | मोदी सरकारकडून अखेर कबुली
एकतर्फी कुठलाही बदल न करता सर्व करार आणि सहमतीचा आदर केला तर चीन बरोबर सीमावादावर तोडगा निघू शकतो असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. या मुद्यावर भारताची भूमिका काय आहे ते जयशंकर यांनी स्पष्ट केले. “१९६२ च्या युद्धानंतर लडाखमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनाती केली आहे” असे जयशंकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
NEET-JEE परीक्षा संदर्भात ७ राज्य सुप्रीम कोर्टात जाणार, सोनिया गांधींच्या बैठकीत निर्णय
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस समर्थित सरकारचे मुख्यमंत्री व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविली. जीएसटी आणि नीट-जेईई परीक्षेबाबत ही बैठक घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
JEE आणि NEET परिक्षा घेण्यावरून स्वामींचा मोदी सरकारला 'विपरीत बुद्धी' टोला
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सतत विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जेईई परीक्षा देणाऱ्या ८० टक्के उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाउनलोड केले असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. “जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाही यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. विद्यार्थ्यांना काळजी लागली होती. आपण अजून किती काळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना सतावत होती,” असं त्यांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कडक लॉकडाउनच्या निर्णयामुळेच अर्थव्यवस्थेशी निगडीत समस्या निर्माण झाली - सुप्रीम कोर्ट
कडक लॉकडाउन जाहीर करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळेच अर्थव्यवस्थेशी निगडीत समस्या निर्माण झालं असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान हे मत नोंदवण्यात आलं. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एम आर शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठाने मोरॅटोरियम काळातील रकमेवर व्याज आकारण्यावर केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्यास सांगितलं. तसंच याप्रकरणी अद्यापही प्रतिज्ञापत्र दाखल न करण्यासंबंधी विचारणा केली.
5 वर्षांपूर्वी -
JEE-NEET परीक्षा घेण्यासाठी आमच्यावर पालक आणि विद्यार्थ्यांचा दबाव होता - केंद्रीय शिक्षणमंत्री
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHCET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHCET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं त्यावरून याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळून लावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रशियन लस'बाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याने भारत अधिक माहिती घेत आहे - ICMR
भारतात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ प्रक्रियेला सुरुवात होणार असताना करोनाबाधित रुग्णसंख्या ३१ लाखांच्या पुढे गेली असून आतापर्यंत ५८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा फैलाव होत असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानीकारक | सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयानं वकील प्रशांत भूषण यांना अवमानना प्रकरणात दोषी करार दिलंय. त्यांच्या शिक्षेवर येत्या २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचं म्हटलं होतं. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चार माजी सरन्यायाधीशांवर कथितरित्या आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. याला ‘कंटेम्ट ऑफ कोर्ट’ (कायद्याचा अवमान) मानण्यात आलं. या प्रकरणात न्यायपालिकेनं संज्ञान घेतलं होतं. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठानं या प्रकरणात भूषण यांना दोषी मानलंय.
5 वर्षांपूर्वी -
भारतावर हल्ला करण्यासाठी जैश आणि ISI'ची बैठक | सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
भारतावर मोठा हल्ला घडवण्याची तयारी पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच रावळपिंडीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये एक गोपनीय बैठक झाली. यामध्ये भारतावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली. या बैठकीची माहिती मिळताच भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
स्वबळावर नाही | भाजप मित्र पक्षांसोबत लढणार बिहार विधानसभा निवडणूक
अनेक ठिकाणी स्वबळाचा नारा देणारा भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीतही हाच फंडा वापरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी घोषणा करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. जे पी नड्डा यांनी जाहीर केले की, भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेन. त्यामुळे स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक भाजप नीतीश कुमार यांचा जनता दल युनायटेड, राम विलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी या मित्रपक्षांसोबत लढणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आला. आता या परिक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कोरोना काळात परिक्षा न घेण्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंनी परिक्षेच्या विषयात लक्ष घालण्याचे केले आवाहन मोदींना केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
MHCET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी | सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळली
महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या MHCET अर्थात अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MHCET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयानं त्यावरून याचिकाकर्त्यांना फटकारत मागणी फेटाळून लावली.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी थेट माझ्याशी बोलले | त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे - कपिल सिब्बल
काँग्रेसच्या कार्यकारी समिती महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहिण्यात आलेल्या पत्राच्या टायमिंगबद्दल राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहिण्यात आलं, त्या पत्रावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमांमध्ये कसं गेलं, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS