महत्वाच्या बातम्या
-
आज सवर्णांकडून आरक्षणाच्या विरोधात भारत बंदची हाक
दलित समाजाच्या केवळ दोन पिढ्यांनाच नोकरी तसेच शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. परंतु त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत दलित आरक्षणाला विरोध करत देशभरातील सवर्ण समाजाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान तसेच बिहार राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेनेच्या राज्यात पेट्रोल दर सेंचुरीच्या दिशेने रवाना, सामान्यांचा खिसा महागाईने जळणार
मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांनाच बसणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थान भाजपच विधानसभेआधी स्मार्टफोन देण्याचं गाजर
राजस्थानमध्ये लवकरच म्हणजे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक सर्व्हे मध्ये राजस्थानमध्ये भाजपच विद्यमान सरकार कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्या राजस्थानमधील वातावरण भाजप विरोधी आणि काँग्रेससाठी अनुकूल असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर यांचा 'डिजिटल सर्वे' म्हणजे माझ्याच ग्राहकासाठी, माझ्याच संस्थेमार्फत, मीच मांडलेलं माझं मत?
कालच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या I-PAC संस्थेने एक ‘ऑनलाईन राजकीय सर्वे’ जाहीर केला. परंतु देशातील परिस्थितीचा सर्वांगीण बाजूने विचार केल्यास, त्या ऑनलाईन सर्वेमध्ये करण्यात आलेले दावे म्हणजे निव्वळ स्वतःच्या भावी ग्राहकासाठी केलेली साखर पेरणीच म्हणावी लागेल. वास्तविक भाजप हा त्यांचा सर्वात प्रमुख ग्राहक आहे. त्यामुळे सर्व्हेत दिसणाऱ्या भावना या सामान्यांच्या किती आणि I-PAC संस्थेच्या किती असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानी व राफेल कराराचा धसका? रायफल उत्पादनापासून केंद्राने अदानींना दूर ठेवलं
आधीच अनिल अंबानी आणि राफेल करारावरून मोदी सरकार अडचणीत आले असताना, त्याचा धसका घेऊन केंद्राने अदानी गृप सोबत रायफलची निर्मिती करु पाहणाऱ्या रशियाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. लढाऊ विमान बांधणीचा कोणताही पूर्व अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचं कंत्राट मिळाल्याने विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणले होते.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच काँग्रेस पुराण संपेना? नोटाबंदीमुळे नाही! रघुराम राजन व यूपीए'च्या धोरणामुळे विकासदर घसरला: राजीव कुमार
निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या विधानामुळे केंद्र सरकार निवडणुकीआधी घसरत्या विकासदरासाठी पूर्व आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांना जवाबदार धरून स्वतःची जवाबदारी झटकण्याची रणनीती आखतं आहे का, असं अर्थतज्ज्ञांना वाटू लागलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोल व डिझेल अजून महागले, महागाईत भर पडण्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ अजूनच अफाट होत असल्याने सर्व सामान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. त्यामुळे महागाईत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ३१ पैशांनी तर डिझेल प्रति लिटर ४४ पैशांनी महागले आहे.
7 वर्षांपूर्वी -
केरळ नंतर आता उत्तर भारतात पावसाचा कहर, १६ ठार जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात मागील २४ तासांपासून पावसाचा कहर सुरु झालं झाल्याने त्यात आतापर्यंत तब्बल १६ जणांनी प्राण गमावले असून १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी शाहजहापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून एकाचवेळी सहा जणांचा मृत्यू झाला.
7 वर्षांपूर्वी -
'कारगिल मॅरेथॉन': आज महाराष्ट्राचा ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ साईश्वर गुंटूक सुद्धा धावणार
काश्मीरच्या खोऱ्यात आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्जिकल स्ट्राईक मागील मराठी चेहरा असलेले राजेंद्र निंभोरकर यांनी आज कारगिल मॅरेथॉनला फ्लॅगऑफ केला. याआधी आयोजित झालेल्या स्पर्धेत तब्बल काश्मीरमधील जवळपास ८०० पेक्षा अधिक आणि बाहेरून आलेल्या जवळपास २०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
7 वर्षांपूर्वी -
जोस बटलरच्या शतकी खेळीने इंग्लंड सुस्थितीत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. त्यामुळे अखेर इंग्लंडने २३३ धावांची आघाडी घेण्यात यश मिळविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल
हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात ४२० हे कलम एफआयआर’मध्ये लावण्यात आलं आहे. त्याबरोबरच हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
रंजन गोगोई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस मोदी सरकारकडे केली असून ते ३ ऑक्टोबर रोजी नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे सत्तेत आहेत : स्वरा भास्कर
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने धक्कादायक विधान करून थेट नरेंद्र मोदींच्या सरकारवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. त्यामुळे नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ”राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे आज देशात सत्तेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात डांबणार का?”, असे बेधडक विधान बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
बॅलेट पेपरने झालेल्या कारगिल स्थानिक निवडणुकीत भाजपला १ जागा तर काँग्रेस व नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीची सरशी
जम्मू काश्मीर मधील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कारगिल येथील पहाडी विकास परिषदेच्या २६ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रेन्स पार्टीने सरशी मारली आहे, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आशियाई क्रिडा स्पर्धा २०१८: बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पांघलची सुवर्ण कमाई
जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. बॉक्सिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या अमित पांघलने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत धोरण नसल्याने अनेक राज्यात बांधकामांना स्थगिती
देशभरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. परंतु वाढत्या मनुष्यवस्तीतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण नसल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांना शुक्रवारी मोठा दणका दिला आहे. जोपर्यंत मनुष्यवस्तीतील घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आणणार नाही तोपर्यंत राज्यांत बांधकामे करता येणार नाहीत, असा महत्वाचा आदेशच न्यायालयाने दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मॉब लिंचिंग तसेच दंगल भडकवणाऱ्या फेक न्यूज'प्रकरणी कंपन्यांच्या प्रमुखांवर कारवाई?
देशातील झुंडबळी अर्थात ‘मॉब लिंचिंग’ सारख्या घटना आणि त्यातून दंगली भडकविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. भारतातील वाढतं इंटरनेटचं प्रमाण आणि त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा गैरवापर रोखण्यासाठी थेट इंटरनेट कंपन्या किंवा सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रमुखांना जबाबदार धरले जाऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
लवासा प्रकल्पाची राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका, दिवाळखोरीच्या वाटेवर?
लवासाला आर्थिक पुरवठा करणाऱ्यांनी ‘लवासा प्रकल्प’ कर्जबाजारी ठरवण्याबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर एक याचिका केली होती. लवासा विरुद्धची ती याचिका लवादाने दाखल करून घेतल्यामुळे ‘एचसीसी’ने तशी माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल कंत्राट कसं काय मिळालं? फ्रान्समधील प्रसारमाध्यम
राफेल लढाऊ विमानाच्या कराराविषयी आता फ्रान्समधील प्रसार माध्यम सुद्धा प्रश्नचिन्हं उपस्थित करू लागले आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फ्रान्समधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या फ्रान्स-२४ ने भारत आणि फ्रान्समधील संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडीओ व्हायरल: रुपया १० पैशाने घसरताच सुषमा स्वराज यांना टीव्ही ऑन करताना भीती वाटायची
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होऊन रुपयाने प्रति डॉलर ७१ रुपये असा निचांक दर गाठला. परंतु नंतर तो नऊ पैशांनी सावरून रुपयाचं मूल्य ७० रुपये ९१ पैशांवर स्थिरावलं आहे. या आर्थिक वर्षात रुपयाचं मूल्य तब्बल १० टक्क्यांनी घसरून आशियातील इतर चलनांच्या तुलनेत भारताच्या रुपयाची ही सर्वात वाईट परीस्थिती आहे. परंतु त्यामुळे २०१३ मधील सुषमा स्वराज यांच्या लोकसभेतील भाषणाची आठवण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER