10 May 2025 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत | काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

Ready To Step Down, Congress President Sonia Gandhi, CWC Meet

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट: काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.

अध्यक्ष म्हणून आता मला कायम राहायचं नाही, त्यामुळे नवा अध्यक्ष शोधा, असं सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपद सोडलं, तर पुढे पक्षाचं नेतृत्व कोण करणार? याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यासह २३ नेत्यांनी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. १५ दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही मुद्दे नेत्यांनी मांडले होते. या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिलं आहे. “काँग्रेस कार्यकारी समितीनं १० ऑगस्टला पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं आपण समितीला सांगितलं होतं. त्याबरोबर हंगामी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लवकरात लवकर पक्षाध्यक्ष पदाची निवड करावी, अशी अटही घातली होती,” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. “पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोडायला तयार असून, एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करावी,” असं सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना म्हटलं आहे.

 

News English Summary: Congress president Sonia Gandhi has responded to a letter written by a group of party leaders, who sought a complete overhaul of the organisation, saying that all of them should get together and find a new chief as she does not want to carry out the responsibilities any further, people familiar with the development said.

News English Title: Ready To Step Down As Congress President Says Sonia Gandhi Ahead Of CWC Meet News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या