भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात दोन साधूंची क्रूर हत्या; मृतदेह मंदिरात आढळले

लखनऊ, २८ एप्रिल: महाराष्ट्रातील पालघर येथील साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील मंदिरात दोन साधूचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
बुलंदशहराच्या अनुपशहर भागात मंदिरात झोपलेल्या अवस्थेत दोन साधुंची धारदार हत्यारानं हत्या करण्यात आली. ही हत्या गावातीलच एका नशेच्या आहारी गेलेल्या मुरारी नावाच्या तरुणानं केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केलीय. साधुंच्या हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात मोठी फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
थाना अनूपशहर क्षेत्र के पगोना गांव में हुई 2 साधुओं की हत्या के संबंध में वरिष्ठ पुलिस अधीक्षक @bulandshahrpol द्वारा दी गई बाइट @Uppolice @adgzonemeerut @igrangemeerut @dmbulandshahr pic.twitter.com/hsKiEYVfan
— Bulandshahr Police (@bulandshahrpol) April 28, 2020
अनुपशहरच्या पगोना गावात ही घटना घडली. गेल्या १० वर्षांपासून गावातील शिव मंदिरात साधु जगदीश (५५ वर्ष) आणि शेर सिंह (३५ वर्ष) राहत होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांची हत्या करण्यात आली. सकाळी काही भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
या प्रकरणी पोलिसांनी खुन्याला ताब्यात घेतलं आहे. साधुंच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा व्यक्ती नशेच्या आहारी गेल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर हत्येचं कारणदेखील सांगितलं. ‘आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी साधुंचा चिमटा उचलला होता. त्यावरुन साधू त्याला ओरडले होते. त्यानंतर त्यानं काल रात्री साधुंची हत्या केली,’ अशी माहिती बुलंदशहरचे एसएसपी संतोष कुमार सिंह यांनी दिली.
News English Summary: While the incident of killing of sadhus at Palghar in Maharashtra is fresh, another sadhu incident has taken place in Bulandshahr district of Uttar Pradesh. The incident came to light after the bodies of two sadhus were found in a temple in the village. Police have arrested the accused in the case and Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has ordered an inquiry.
News English Title: Story 2 Sadhus Killed Inside Temple In Up Accused Arrested in Uttar Pradesh News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER