Atrocity Act | अनेकांना पडलेला प्रश्न, अॅट्रॉसिटी अॅक्ट म्हणजे काय? - नक्की वाचा

मुंबई, २८ ऑगस्ट | सध्या सर्वत्र एकच वादळ उठलेलं दिसतंय. सर्वत्र चर्चा, बॅनर, सोशल साईट वगैरे ठिकाणी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा आणि मराठा समाजाचा मूकमोर्चा असा तो विषय. नेमकं हा विषय काय आहे आणि काय चालू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कित्येक जण तर कुठलाही विचार न करता फक्त आपला पाठिंबा देत आहेत. कुणी जातीमुळे तर कुणी काही चांगलं असेल तर कुणी इतर करत आहेत म्हणून आपण सुद्धा अनुकरण करतोय याची सुद्धा कल्पना नाही. असो, नेमकं अॅट्रॉसिटी कायदा आहे हे जाणून घेऊया.
अनेकांना पडलेला प्रश्न, अॅट्रॉसिटी अॅक्ट म्हणजे काय? – What is atrocity act in Marathi :
हा कायदा विश्वनाथ प्रताप सिंहांच्या कारकिर्दीत निर्माण झाला. दलितांना आणि आदिवासींना यामुळे सरंक्षण मिळाले आहे. असे असले तरी या कायद्याची बाजू पकडून या ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’चा वापर करून खोट्या केसेस फाईल केल्या जातात, असे म्हणणारे सुद्धा चुकीचे नाहीत. अशा केसेस होत असतील किंवा झाल्यासुद्धा असतील. प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कुठलीही गोष्ट चांगल्यासाठी निर्माण होत असते परंतु त्याचाच चुकीचा वापर केला तर त्याच्या चांगला हेतू नष्ट होतो.
मागील अनेक वर्षांमध्ये जे काही कायदे निर्माण करण्यात आले, त्यात दलितांना आणि आदिवासींना एका कायद्याचे संरक्षण देण्यात आले तो कायदा म्हणजे ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’. या कायद्याला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 असे संबोधण्यात येते. फक्त जातीवाचक बोलले तर ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट'(atrocity act) लागतो असे नाही तर या कायद्या अंतर्गत कुठली कलम लागू होतात ते बघूया.
What is the punishment for the Offences of atrocities?
अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीला योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्या-पिण्याची सक्ती केल्यास कलम 3(1)1, इजा/अपमान करणे व त्रास दिल्यास कलम 3(1)2, नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा केल्यास कलम 3(1)3, जमीनीचा गैर प्रकारे ताबा घेणे कलम 3(1)4 नुसार, मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण केल्यास कलम 3(1)5, बिगारीची कामे करण्यास जोर जबरदस्ती केल्यास कलम 3(1)6, मतदान करण्यास भाग पाडणे वा धाक दाखवल्यास कलम 3(1)7, खोटी केस, खोटी फौजदारी केल्यास कलम 3(1)8, लोक सेवकास खोटी माहिती पुरवल्यास कलम 3(1)9, सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्यास कलम 3(1)10, महिलेचा विनयभंग केल्यास कलम 3(1)11, महिलेचा लैंगिक छळ केल्यास कलम 3(1)12, पिण्याचे पाणी दुषित करणे वा घाण केल्यास कलम 3(1)13, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारल्यास कलम 3(1)14, घर, गांव सोडण्यास भाग पडल्यास कलम 3(1)15, खोटी साक्ष व पुरावा दिल्यास कलम 3(2)1,2, नुकसान करणे हेतू आग लावल्यास कलम 3(2)3, प्रार्थना स्थळ अथवा निवाऱ्यास आग लावल्यास कलम 3(2)4, कलम 3(2)5: IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करणे, पुरावा नाहिसा केल्यास कलम 3(2)6, लोकसेवकाने कोणताही अपराध केल्यास कलम 3(2)7 अशी तरतूद या कायद्या अंतर्गत करण्यात आली आहे.
एवढया प्रकारे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा लावता येतो. भारतीय दंडविधान (IPC) नुसार कोणत्याही गुन्ह्यास 10 वर्षे शिक्षा आहे. परंतु अनुसूचीत जाती-जमातींच्या व्यक्तींच्या संबंधित कायदा असेल तर जन्मठेप होऊ शकते. तर अशी आहे ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’ नुसार होणारी शिक्षा. कोपर्डी प्रकरणामुळे दोन गटांत असलेला वाद हा सध्या गाजतोय आणि त्या अनुषंगाने ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’ हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. तर असा आहे हा ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’(atrocity act)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Article Title: What is atrocity act in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल