29 April 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

शाहीन बाग गनमॅन कपिल गुर्जरचा भाजपात प्रवेश | माध्यमांत टीका होताच हकालपट्टी

Delhi Shaheen Baug, shooter Kapil Gujjar, joins BJP party, controversy

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर: दिल्लीच्या शाहीन बाग येथे १ फेब्रुवारी २०२० रोजी सीएएच्या निषेधाच्या विरोधात एका व्यक्तीने गोळीबार केला होता. गोळीबाराच्या वेळी आरोपी ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत होता. पोलीस चौकशीत आरोपीने आपले नाव कपिल गुर्जर असे सांगितले होते आणि तो पूर्व दिल्लीतील दल्लूपुरा येथील रहिवासी होता. चौकशीमध्ये आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, ‘या देशात केवळ हिंदूच चांगले काम करतील.’

त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच वय 25 वर्ष आहे आणि तो एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही मुठभर लोकांनी आपल्याच देशातील शाहीन बागेत आंदोलन सुरू करू बाग हस्तगत केली आहे. याचा त्याला राग आला आणि त्यामुळे कपिल गुर्जरने तिथे गोळीबार केला. त्याने परिसरातून रिक्षा केली आणि तो शाहीन बागेत गेला. तिथे त्याने 2 गोळ्या झाडल्या होता.

मात्र तोच गोळीबार करणारा गनमॅन कपिल गुर्जर याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून शाहीन बाग गनमॅन कपिल गुर्जर भाजपमध्ये सामील झाले. हे गुठळ्या, ठग, बंदूकधारी आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. या संदर्भात ट्विट करताना प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे की, ‘शाहीन बाग गनमॅन कपिल गुर्जर भाजपमध्ये सामील झाला आहे. हे ठग, बंदूकधारी आणि दहशतवाद्यांचे नैसर्गिक ठिकाण आहे. तरीही, हिंसक गुन्हे हे भाजपासाठी राष्ट्रवादाचे लक्षण आहे.

सदर वृत्त पसरताच सर्व विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आल्याची सारवासारव पक्षाकडून करण्यात आली. गुर्जरच्या पक्षप्रवेशाबाबतच्या गोंधळाबाबत गाझियाबादचे जिल्हाध्यक्ष संजीव शर्मा यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ‘बहुजन समाज पक्षातील कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातच गुर्जरही होता. शाहीनबाग आंदोलकांवर त्याने गोळीबार केल्याबाबत आम्हाला माहिती नव्हती.’ विरोधी पक्षांकडून जोरदार टीका झाल्यानंतर गुर्जरचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

 

News English Summary: As soon as the news spread, all the opposition parties raised criticism. He was later expelled from the party. Ghaziabad district president Sanjeev Sharma revealed the confusion over Gurjar’s party affiliation. He said, ‘Bahujan Samaj Party workers joined the BJP on Wednesday. Gurjar was also in it. We did not know about his firing on the Shahinbagh protesters. Gurjar’s membership was canceled after strong criticism from the opposition.

News English Title: Delhi Shaheen Baug shooter Kapil Gujjar joins BJP party controversy news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x