कोरोनाव्हायरस कमकुवत होत असल्याचा दावा WHO'ने फेटाळला..काय म्हटलं?

वॉशिंग्टन, २ जून: कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपलं रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे.
इटलीतील डॉ. अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस आता आपली क्षमता गमावत असून तो कमी प्राणघातक होतो आहे. गेल्या १० दिवसात जे स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना व्हायरसची क्षमत कमजोर पडत असल्याचे दिसून आले आहे, असा खुलासा अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी केला आहे.
मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे दावे फेटाळले आहेत. तसेच लोकांनी नेहमीप्रमाणे काळजी घेणे आवश्यक असल्याचंही म्हंटलं आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात इटलीमध्ये मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये आतापर्यंत ३३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, मात्र नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
मिलानच्या सॅन राफेल हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर अल्बर्टो जंग्रिलो म्हणतात की, क्लिनिकली व्हायरस आता इटलीमध्ये नाही आहे. हे रुग्णालय लॉम्बार्डी शहरात आहे जिथं १६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. इटलीच्या RAI या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर अल्बर्टो म्हणाले की, ‘गेल्या १० दिवसांत झालेल्या स्वॅब टेस्टमध्ये व्हायरसचे प्रमाण खूप कमी आहे. एक किंवा दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ते म्हणाले की संक्रमणाच्या दुसर्या टप्प्याबाबत काही तज्ज्ञ चिंतित आहेत आणि नेत्यांनी ते गांभीर्याने घेतलं पाहिजे.
जेनोआ येथील सॅन मार्टिनो हॉस्पिटलमधील संसर्गजन्य आजारांचे प्रमुख, माशिओ बसेटी यांनी असे म्हंटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी हा विषाणू आता इतका शक्तिशाली होता. तितका आता नाही आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे दावे फेटाळले आहेत. WHOचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या समजुती पसरवू नये की व्हायरस अचानक स्वतःच कमकुवत झाला आहे. तरीही आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
News English Summary: The World Health Organization emergencies director Michael Ryan has stressed that the new corona virus has not suddenly become less pathogenic, following claims by an Italian doctor Alberto Zangrillo that Covid-19 had lost some of its potency.
News English Title: Corona virus is not becoming less-potent who says after Italian doctor Alberto Zangrillo claim News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल