2 May 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

FYJC Class Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार | कशी असेल संपूर्ण प्रक्रिया

Class XI admission

मुंबई, २८ मे | मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मुलांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. तर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 100 गुणांची असेल. ती OMR पद्धतीने घेतली जाईल. त्यासाठी दोन तासांचा अवधी दिला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

  1. अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
  2. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
  3. प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
  4. गुण – 100
  5. बहुपर्यायी प्रश्न
  6. परीक्षा OMR पद्धतीने
  7. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
  8. कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
  9. CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
  10. CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
  11. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
  12. CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

 

News English Summary: Tenth graders will be passed on the basis of internal assessment. An optional CET examination will be conducted for Class XI admission. This exam will ask multiple choice questions. This exam will be of 100 marks. It will be taken by OMR method. A period of two hours will be given for this, informed Varsha Gaikwad.

News English Title: An optional CET examination will be conducted for Class XI admission in Maharashtra news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या