1 May 2025 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

चक्रीवादळ: रायगड प्रशासनाने तब्बल १३,५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

Alibaug, Cyclone Nisarga

रायगड, ३ जून: सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या. काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील एकूण १३ हजार ५४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

 

News English Summary: Around 390 people have been shifted to a relief camp setup at a school in Alibaug, in view of the CycloneNisarga that will cross Maharashtra coast between Harihareshwar & Daman, very close to Alibaug between 1 pm to 4 pm today News Latest updates.

News English Title: Around 390 people have been shifted to a relief camp setup at a school in Alibaug News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या