1 May 2025 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

नगराध्यक्ष: चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुर-रत्नागिरीतील भोपळा लपवत सावंतवाडीवर ट्विट

MLA Chandrakant Patil

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजप विजयी होत असल्याचं दाखविण्यासाठी आटापिटा. वास्तविक रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखत आपला गड कायम राखला. संघर्षमय झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी १०९२ मतांनी विजयी झाले. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली आहे सेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांनी भाजपा समांतर खालोखाल मते मिळवल्याने शिवसेनेचा विजय सुकर झाला एका परीने सेनेला आपले अस्तित्व दाखवता आले त्यामुळे भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

या निवडणुकीत भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, चित्रा वाघ अशी दिग्गज मंडळी उतरवली होती आमदार प्रसाद लाड या मतदारसंघात ८ दिवस तळ ठोकून होते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहरात पायी प्रचार फेरी काढून रंगत भरली होती.

दुसरीकडे सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी रविवारी मतदान झाले. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, भाजपचे अधिकृत उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब, महाविकास आघाडीचे खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, काँग्रेसचे ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर हे निवडणूक लढवत होते.

मागील अनेक वर्षांपासून इथे शिवसेनेचाच नगराध्यक्ष होता. मुळात दीपक केसरकर यांचा हा गड मानला जात होता. त्यामुळे दीपक केसरकर विरूद्ध नारायण राणे अशा प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीमध्ये भाजपची सरशी झाली आणि सावंतवाडीचं नगराध्यक्षपद शिवसेनेच्या हातून निसटलं. मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कोणताही योगदान नसून हे केवळ राणे कुटुंबियांमुळे शक्य झाल्याचं सर्वश्रुत असलं तरी रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये भाजपचं झालेलं पानिपत लपविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी संदर्भात ट्विट करत स्वतःच समाधान करून घेतल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

 

Web Title:  BJP State President Chandrakant Patil twit over Sawantwadi Nagaradhyaksha Election Victory but quite over Kolhapur and Ratnagiri.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या