3 May 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सद्याच्या स्थितीत तरी शाळा लगेच सुरु करणं अत्यंत अवघड - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, Schools Reopening

मुंबई, २८ मे: देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची ही महाराष्ट्रात आहे आणि विशेष म्हणजे त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या अनेक संभ्रम आहे. याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीने झाली. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, “शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असंच सुरु आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसं करायचं यावर विचार सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे” असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यात आज नव्या २ हजार १९० रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण संख्या आता ५६ हजार ९४८ वर गेली आहे. आज ९६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १७ हजार ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १०५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत १८९७ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण ३७ हजार १२५ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

राज्यात आज १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९, नवी मुंबईत ७, रायगडमध्ये ७, अकोल्यात ६, औरंगाबादमध्ये ४, नाशिकमध्ये ३, सोलापुरात ३, साताऱ्यात २, अहमदनगर, नागपूर, नंदूरबार, पनवेल, वसई-विरार येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर गुजरात येथील एका व्यक्तीचाही मुंबईत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७२ पुरुषांचा आणि ३३ महिलांचा समावेश होता. मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील ५० रुग्णांचा समावेश होता. ४० ते ५९ वयोगटातील ४५ रुग्ण तर ४० वर्षाखालील १० मृतांचा यात समावेश होता. या १०५ मृत रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग अशा स्वरुपाचे अति जोखीमेचे आजार आढळले होते.

 

News English Summary: Maharashtra has the highest number of corona patients in the country and it is increasing day by day. The situation is very bad in cities like Mumbai and Pune. So schools in the state are closed in the lockdown and will they be reopened or not? There is a lot of confusion among parents about this. Explaining this, Chief Minister Uddhav Thackeray has said that it is difficult to start school immediately.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray talked on state Schools Reopening News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या