ट्रॉलिंगसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रचंड फेक अकाऊंट - फडणवीस

मुंबई, २३ जून : देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतला होता. ऐनवेळी सत्ता वाटपाचं सूत्र न जुळल्यानं शिवसेना भाजपापासून दूर गेली. त्यानंतरही भाजपानं राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार अल्पजीवी ठरलं. या नाट्यात देवेंद्र फडणवीस यांना सर्वकाही जुळवून येऊनही मुख्यमंत्री होता येत नसल्याची घटना फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. खुद्द फडणवीस यांनीच पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलाखती दुःख बोलून दाखवलं.
यावेळी सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण फॉलो करता, पण नरेंद्र मोदी कधीच कुणाला ब्लॉक करत नाहीत. मग, आपण सोशल मीडियावर काहीजणांना का ब्लॉक करता? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना आम्ही कधीच कुणाला ब्लॉक करत नाही. मात्र, फेक अकाऊंटच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक ट्विट किंवा पोस्टवर जाणीवपूर्वक गचाळ भाषेत, वाईट आणि द्वेषात्मक कमेंट करण्यात येत आहेत. त्यामुळे, आमच्याकडून केवळ अशा फेक अकाऊंटन्सा ब्लॉक करण्यात आले आहे. वैचारिक पातळीवर चर्चा असेल, खरं अकाउंट असेल तर आम्ही उत्तर देऊ, मुद्दा पटवून सांगू. मात्र, फेक अकाऊंटद्वारे नाहक वाईट आणि गलिच्छ टिपण्णी करणे योग्य नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
सोशल मीडयाव सध्या 1.5 लाख फेक अकाऊंट आहेत. काँग्रेसचे फेक अकाउंट जास्त नसून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचंड फेक अकाऊंट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करण्यात येत आहे. महाराष्ट्र बचाव आंदोलनावेळी ट्विटर ट्रेडिंगमध्ये आमच्या आंदोलनाचे ट्विट होते. मात्र, या पक्षांच्या समर्थकांनी फेक अकाउंट तयार करुन आंदोलनाविरुद्ध मोहीम सुरु केली. यातूनच हे फेक अकाऊंट उघड झाले असून तेच फेक अकाऊंट आमच्याकडे ब्लॉक झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
News English Summary: Devendra Fadnavis discussed various issues in an interview to a YouTube channel. He also gave heartfelt answers on the current Corona situation in the state, politics, the economic situation of the country and trolling on social media.
News English Title: Former CM Devendra Fadnavis were Disturbed After Govt Collapse News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH