30 April 2025 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

भाजपचे आमदार फुटू नये म्हणून काही दिवस ते सरकार पडणार असं बोलत राहतील - जयंत पाटील

Minister Jayant Patil, Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi

मुंबई, १२ नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पक्ष सोडून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश करु नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत बोलावं लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडणार, असं वारंवार बोलावं लागतं. अजून काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, अशी खिल्ली उडविणारी टिपणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील गुरुवारी औरंगाबादमध्ये आले होते. यानंतर त्यांनी सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे देखील उद्घाटन केले. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी देखील बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची देखील बंडखोरांमुळे डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच राष्ट्रवादीच्या अडचणीत देखील भर पडली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचेच कट्टर समर्थक असलेल्या शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र, आता मुंडे समर्थकांनी केलेल्या डबल बंडखोरीचा भाजपला मोठा धक्का बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has to keep saying, “This government will fall” so that BJP MLAs do not leave the party and join the Mahavikas Alliance, said Jayant Patil, Minister of State for Tola and State President of NCP. Leader of Opposition Devendra Fadnavis has to say again and again that Mahavikas Aghadi government will fall to retain his people. They will keep talking like that for some more time. After that, Fadnavis’s speech will automatically stop, said Jayant Patil.

News English Title: Minister Jayant Patil criticized opposition leader Devendra Fadnavis news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या