11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करून काँग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठी हालचाली?

NCP President Sharad Pawar, Congress President Sonia Gandhi, Maharashtra Vidhansabha Election 2019

नवी दिल्ली: एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगळ्या दिशेला वळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वात राज्यात सत्ता स्थापन करण्यास एनसीपी पक्ष इच्छुक असल्याचे एनसीपी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला माहिती देताना सांगितले. परंतु, असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्षपद हवे आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात असे सरकार स्थापन होत असल्यास, काँग्रेस पक्षाने सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.

दरम्यान, काल शरद पवार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेनेच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसं जाणार, असं सांगून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. महाराष्ट्रात जाणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही भाष्य केले.”शिवसेना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मात्र सरकार स्थापन करण्याबाबत किंवा पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेने अद्याप विचारणा केलेली नाही. आम्हीही कुणाशी संवाद साधलेला नाही. तसेच कुणाशी बैठकही घेतलेली नाही, असे पवार यांनी सांगितले.

शिवसेनेला काँग्रेस-एनसीपी पाठिंबा देणार ? या प्रश्नावर त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झालेली नाही. त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनणार या चर्चेलाही पवारांनी पूर्णविराम दिला. आपण मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x