14 December 2024 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | भाजप आणि मनसेकडून शिवसेनेवर टीकास्त्र

MNS party, Shivsena, Aurangabad, Sambhajinagar

मुंबई, ०३ जानेवारी: औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भारतीय जनता पक्षाला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्षाचे मागील ५ वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला. संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.

दरम्यान, केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून देखील त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केवळ अग्रलेख लिहून काही होणार नाही, राज्यात तुमचे सरकार आहे. आता औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवा. आम्ही २६ जानेवारीपर्यंत वाट पाहू. नाहीतर, आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीच मला औरंगाबाद म्हणण्याची मुभा दिली, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक बातमीचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शेअर केले आहे. या बातमीसह औरंगाबादच्या नामांतरणावरुन नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. ”संभाजीनगर हेच नामकरण झाले पाहिजे, श्रेय केंद्र अथवा राज्य सरकार कोणीही घ्यावे. सेनेला केवळ एवढे विचारावे वाटते की तुमचे मंत्री अब्दुल सत्तार खरे बोलले कि खोटे? सोबत जोडलेला फोटो बरेच काही सांगून जात आहे. माननीय बाळासाहेबांचा शब्द व स्वप्न पूर्ण करावे.”, असे देखील बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: He also pointed out that despite the BJP being in power at the Center, no decision has been taken. Nothing will happen just by writing a headline, the state has your government. Now show Aurangabad as Sambhajinagar. We will wait until January 26. Otherwise, we will start agitation, has been warned by Sandeep Deshpande, General Secretary of Maharashtra Navnirman Sena.

News English Title: MNS party target Shivsena over renaming Aurangabad as Sambhajinagar news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x