मुंबई : दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत, तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. उद्या दि. १७ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास ढाले यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील झुंजार पँथर राजा ढाले यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने संघर्षाचे एक वादळ शांत झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2019
दरम्यान राजा ढाले यांच्या निधनाने सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानिमित्त अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एनसीपीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील राजा ढाले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दलित पँथर चे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दलित पँथर चे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली???? pic.twitter.com/BcYuCMZmFf
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2019
