23 April 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

कोरोनाच्या काळात राजकारण करणाऱ्या प्रवृतींना त्यांची जागा दाखवायला हवी - अमोल कोल्हे

NCP MP Amol Kolhe

पंढरपूर, १५ एप्रिल: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे” अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले.

महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे”.

भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत व्हिडीओ शेअर करत केले आहेत. भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील, असा विश्वासही कोल्हेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोणाचा झेंडा पंढरपूर निवड़णूकीत झळकरणार हे येत्या काळात पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

 

News English Summary: Pandharpur Mangalvedha Tuesday by-election campaign has reached on highest level. NCP and BJP leaders are once again playing catch-up on the occasion of elections. “In the Corona crisis, there is an opportunity to show the place of the political tendencies,” said NCP MP Dr. Amol Kolhe appealed to the people to vote.

News English Title: NCP MP Amol Kolhe slams BJP over Pandharpur Mangalvedha by poll election campaign news updates.

हॅशटॅग्स

#AmolKolhe(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x