महत्वाच्या बातम्या
-
तथ्यहीन वृत्त आणि उतावळ्या पोस्ट | थेट पोलिसाला, अधिकाऱ्याला कपडे काढून चोप देण्याची भाषा
जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती. अधिवेशनाच्या काळात अशी निराधार वृत्त देताना विरोधकांना खाद्य मिळेल आणि सेल्फ ब्रॅण्डिंग करता येईल
4 वर्षांपूर्वी -
महिलांच्या वसतिगृहात पुरुष पोलीस आत कसे जातील? | तथ्यहीन वृत्तांमुळे पोलिसांची बदनामी
जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | RT-PCR'च्या 110 नमुन्यांत आढळली बुरशी | पुन्हा कोरोनाची चाचणी होणार
काल दिवसभरात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, काल ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्य समोर येतंय | पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवकाने चोरल्याचा संशय | अन इथेच शिजलं?....
राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | DFCCIL मध्ये 1099 पदांसाठी भरती | मुंबई-नागपूर कार्यालय
DFCCIL Recruitment 2021, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 1099 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत विरोधकांना प्रतिउत्तर | हे होते महत्त्वाचे मुद्दे
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हिंदुत्व, बाबरी मशीद, शर्जील उस्मान, काश्मीर पंडीत, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून ते युती तुटण्यापर्यंतच्या मुद्दयावरून भाजपला फैलावर घेतलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट निर्लज्जच संबोधलं. मुख्यमंत्र्यांचं हे रौद्ररुप पाहून भाजप सदस्यही चिडीचूप होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगरपालिकात ११६ पदांची भरती
पीएमसी भरती २०२१. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ११६ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार १८ मार्च २०२१ रोजी पुणे एमसी भरती २०२० वर किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि पीएमसी भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
पुणे | सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणाऱ्या वसंत मोरे यांच्याकडे मनसे शहराध्यक्ष पद
आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या वर्षभर आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान शहराध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर बुधवारी (दि. ३) त्यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले होते. मुंबईमध्ये या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची होणार चौकशी - उपमुख्यमंत्री
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विधिमंडळात महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसाची सुरुवातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खडाजंगीने झाली. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वृक्षारोपण मोहिमेवर नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केले. तसेच चौकशीची मागणी सुद्धा केली. त्यावर वाद होत असतानाच सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची चौकशी होणार असल्याचे सांगत फडणवीसांना दणका दिला.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल कुठे न कुठे चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं - राष्ट्रवादी
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपसह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
शिरूर | खा. अमोल कोल्हे यांचा विकास कामांचा धडाका | वढु बु. प्रजिमा १९ या रस्त्यासाठी 6.5 कोटी मंजूर
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिग्गज माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. मात्र त्यांच्या मतदारसंघात आता विकास कामांचा धडाका देखील सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
MBBS Final Year Exam | ८ मार्चपासून परीक्षा ऑफलाईनच होणार
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून MBBS अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणच्या वडिलांकडून शांताबाई राठोड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत, त्यामुळे शांताबाई राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा अशी तक्रार लहू चव्हाण यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे, त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फँड्री फेम जब्या | सोमनाथ अवघडे'चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा'
Rang Pirticha Bawara Song, फँड्री फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे’चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ‘फ्री हिट दणका’ या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात विनामास्क, विना RTPCR चाचणी प्रवेश बंदी | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळली
कोरोनाने राज्यात धुमाकूळ घातल्यापासून सरकारने वारंवार मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे या उपाययोजना पाळायल्या सांगितल्या आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच कधीच मास्क घातला नाही. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. परंतु राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड १९ संसर्ग RTPCR चाचणी करणं आवश्यक होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
मिटकरी भावा! माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार - चित्रा वाघ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या तेव्हा त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणात माझा आवाज दाबण्यासाठी सुड बुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा मिटकरी यांनी चित्र वाघ यांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही - उपमुख्यमंत्री
वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरण | सर्व शाखांचे ऑडिट होणार | दरेकरांच्या अडचणीत वाढ
मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवण्यात आघाडीवर असलेले भाजप आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप असलेल्या मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठवाडा-विदर्भात अजित पवारांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केलं पाहिजे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्तीवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यपाल विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्यावेळेस विकास मंडळांची घोषणा करु. अजित पवारांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही, असा हल्ला चढवला होता.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांचा 4 मार्चला नाशिकच्या दौरा | पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी म्हणजे 4 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दारूर्यंत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ आणि निवडक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे, इतर पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्याला भेटण्यासाठी गर्दी करु नये, असे विनंती राज ठाकरे यांनी केल्याचे कळते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN