महत्वाच्या बातम्या
-
फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात | राज्य सरकारचा निर्णय
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health Alert | राज्यात अमरावतीच्या बडनेऱ्या गावांत २८ कोंबड्यांचा अचानक मृत्यू
महाराष्ट्राची चिंतेत भरलेली माहिती माहिती आहे. राजरोल अमराव जमीन बडनेसंत २८ कोंब भगवान दत्ताची माहिती झाली. बडनेस राहे उमेश गुलरंधे, नलिनी फेंडर, गजानन कडव, अजय चोरियामले जायकमा २८ कोलंबो मृत्युमुखाली. अचानक वाढणारी कोस येथे राहणा मृत्यु्या मृत्युमुखी मेळाव्याची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
युतीमुळे ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला | यावेळी वेगळं चित्र दिसेल - आशिष शेलार
ठाण्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीमुळेच शिवसेनेचा महापौर आतापर्यंत झाला, परंतु, आता हे चित्र बदलेले सर्वांना दिसणार असून ठाण्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे ठाणे प्रभारी आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये अतिशय मोठे नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकरांमुळे पक्ष सोडला
नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत काल शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगरपालिका भरती 2021 | अर्ज डाउनलोड करा
Pune Municipal Corporation Recruitment 2021. पुणे महानगरपालिका येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 214 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भंडारा | शिशु केअर युनिटच्या अग्नितांडवात १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू | चौकशीचे आदेश
नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळला | चौघांचा जागीच मृत्यू
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक थेट 200 फूट दरीत कोसळला असून 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर अंदाजे 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेतून हकालपट्टी | नंतर शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत
सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. परंतु अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा – उदयनराजे
औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय. नामांतर झालंच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतलीय तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असं म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी -
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार | मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. तसंच घोडाझरी शाखा कालवा इथं सुरु असलेल्या कामाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पुढील दौऱ्यावर निघाले असता, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक थांबल्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
4 वर्षांपूर्वी -
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो - उपमुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
IAS अधिकाऱ्याला आईवरून शिवीगाळ | तेच आपल्याबाबत घडताच पोलीस अधिकारी लक्ष - सविस्तर वृत्त
तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करण्यात आली. मागील ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
MPSC च्या परीक्षा जाहीर | उमेदवारांसाठी सुवर्ण संधी
जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | वसंत गिते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट ED कार्यालयात जमा
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती पासपोर्ट अर्जात लपवल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस भरतीचा GR रद्द | मराठा समाजातील उमेदवारांना दिलासा
राज्यातील पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात 4 जानेवारीला गृहविभागाने काढलेला जीआर अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलिस भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल, असा उल्लेख होता. आता तो जीआर रद्द करण्यात आल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिक्षक-पदवीधर निवडणुकीत भाजप सर्व जागा जिंकणार या भविष्यवाणीनंतर अजून एक भविष्यवाणी
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांना समर्थन देण्यासाठी भाजपाने आज कणकवलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या रॅलीनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस इज बॅक | ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC